गोवा : पणजीत चक्रीवादळाच्या तयारीसाठी ‘मॉकड्रिल’ | पुढारी

गोवा : पणजीत चक्रीवादळाच्या तयारीसाठी ‘मॉकड्रिल’

पणजी; पुढारी वृत्तसेवा : राजधानी पणजीमध्ये चक्रीवादळाच्या तयारीबाबत मॉकड्रिल घेण्यात आले. यावेळी आयवा-दोनापावला येथील जलक्रीडा प्रकल्पाच्या इमारतीवर हेलिकॉप्टर उतरवण्यात आले. स्थनिकांना सुरुवातीला काही अघटित प्रकार घडल्याचे वाटले. मात्र, हे केवळ मॉकड्रिल असल्याचे समजताच नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

राज्यात चक्रीवादळ आल्यास काय करायला हवे? आपत्ती निवारण व्यवस्थापन कितपत सक्रिय आहे, हे जाणून घेण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलातर्फे मॉकड्रिल करण्यात आले. यावेळी इमारतीच्या छतावर अडकलेल्यांना खाली आणणे, हेलिकॉप्टरद्वारे लोकांना बाहेर काढणे याबाबत प्रात्यक्षिके करण्यात आली.

Back to top button