गोव्यात ऑलिव्ह रिडलेंनी घातली तब्बल साडेपाच हजारांवर अंडी | पुढारी

गोव्यात ऑलिव्ह रिडलेंनी घातली तब्बल साडेपाच हजारांवर अंडी

पणजी : पुढारी वृत्तसेवा : यंदाच्या हंगामात ऑलिव्ह रिडले कासवांनी आतापर्यंत गोव्यातील ४६ ठिकाणी सुमारे साडेपाच हजार अंडी घातल्याची माहिती वन खात्याकडून मिळाली आहे. यामध्ये गालजीबाग, आगोंद, आश्वे – मांद्रे, मोरजी, तळपण या नेहमीच्या किनाऱ्यांसह हरमल, वागातोर आणि केळशी या किनाऱ्यांचा समावेश आहे. यंदाच्या मोसमात ऑलिव्ह रिडले कासवाने सर्वप्रथम तळपण किनारी १८ डिसेंबर रोजी अंडी घातली होती.

मोरजी, आश्वे-मांद्रे (उत्तर गोवा) आणि गालजीबाग, आगोंदा (दक्षिण गोवा) येथे कासव अंडी घालायला येतात. अन्य ठिकाणी क्वचितच कासव दृष्टीस पडतात. यामुळे तिन्ही क्षेत्रे ही संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. या परिसरात बांधकामे, नृत्यरजनी, वीज दिव्यांचा झगमगाट, पर्यटकांना फिरणे आदींवर बंदी आहे. पण सरकारी यंत्रणा तोकडी पडत असल्याने कोणी नियमितपणे देखरेख ठेवत नाहीत. काही विदेशी पर्यटक स्वतःहून कासवांची काळजी घेतात, त्यांच्यावर देखरेख ठेवतात. प्रमाण कमी झाले ऑलिव्ह रेडली प्रजाती ही दुर्मीळ आहे. गोव्यात मात्र ही प्रजाती सापडते. कासवांच्या पिलांना जन्मल्यानंतर लागलीच समुद्राच्या पाण्यात सोडली तर ती मोठी होतात. यातून ही प्रजाती वाढते. अभ्यासकांच्या मते मादी कासव जगण्याचे प्रमाण हे हजारामागे एक असे आहे. मात्र अलीकडच्या काळात शंभरहून कमी कासवांची पिल्ले एकावेळी सापडतात. यापूर्वी ती हजारोंच्या संख्येने सापडायची. खोल समुद्रात मोठ्या जहाजातून होणारी यांत्रिक मासेमारी, कारखान्यामधून सोडले जाणारे रसायन, जहाजातून सांडणारे इंधन याचाही फटका या प्रजातीला बसत आहे. १९९७ पासून संवर्धन केंद्र राज्य सरकारने ऑलिव्ह रिडले कासवांसाठी १९९७ साली कासव संवर्धन केंद्र उभारले होते. यामध्ये उत्तर गोव्यातील मोरजी आणि आश्वे, तर दक्षिणेतील गालजीबाग, आगोंद या किनारपट्टी संरक्षित केल्या होत्या. १९९७ पासून ते २०२३ पर्यंत या किनारपट्टीवर सरासरी ३० घरट्यांची नोंद होती.

कासव पिलांची संख्या

  • ऑक्टोबर ते एप्रिल या दरम्यान अंडी घातली जातात. गतवर्षी केवळ ८९ अंड्यांतून कासवाची पिले जन्माला आली.
  • मोरजीत २००३ मध्ये ३१, तर २०१४ मध्ये ३ वेळाच पिले सापडली होती. कासवांची पिले मोठ्या प्रमाणात सापडली होती.
  • आगोंदा येथून २६२७, गालजीबाग येथून १९५८, तर मोरजीतून २४३९ कासव पिले सोडण्यात यश आले होते.

Back to top button