पणजीत पारंपरिक कार्निव्हलला परवानगी नाही; आपकडून सरकारचा निषेध | पुढारी

पणजीत पारंपरिक कार्निव्हलला परवानगी नाही; आपकडून सरकारचा निषेध

पणजी; पुढारी वृत्तसेवा : शहरातील पारंपरिक कार्निव्हलला पुनरुज्जीवित करण्यासाठी नागरिकांनी साव टोम आणि फॉन्टेनहास भागात कार्निव्हल डो पोवो किंवा लोकांचा कार्निव्हल आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, प्रशासनाने रस्त्यांच्या कामाचे कारण देऊन त्याला परवानगी नाकारली आहे. यामुळे पणजीतील स्थानिक नागरिक नाराज झाले आहेत.

याबाबत आप नेते वाल्मिकी नाईक म्हणाले की, अलिकडच्या काळात पणजीतील पर्यटन खात्याचा कार्निव्हल पूर्णपणे व्यावसायिक बनला आहे. कार्निव्हल, कॅसिनो लॉबीनेही ताब्यात गेले आहे. अशावेळी स्थानिकांनी एकत्र येऊन पारंपरिक कार्निव्हल करण्याचे ठरवेल होते. मात्र, त्याला सूडबुद्धीने परवानगी नाकारण्यात आली आहे. परवाना मिळू नये, यासाठी मुद्दामून जुने पोस्ट खात्याजवळील रस्ता खोदण्यात आला आहे.

ते म्हणाले, हे कृत्य लोकशाही आणि लोकविरोधी आहे. याचा आम्ही तीव्र निषेध करतो. कार्निव्हल हा लोकांचा उत्सव आहे जो समुदायांना एकत्र आणतो. पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी पुढाकार घेऊन हा महोत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी आयोजकांना सहकार्य करावे. अन्यथा परवानगी नाकारण्यामागे ते आणि त्यांच्या नगरसेवकांचा थेट सहभाग असल्याचे सिद्ध होईल.

Back to top button