Air Pollution | राज्यात श्वसन आजारांच्या रुग्णांत 44 टक्क्यांनी वाढ

Air Pollution | आमदार कार्ल्स फेरेरा यांच्या प्रश्नावर आरोग्यमंत्र्यांचे उत्तर
Construction Air Pollution
Construction Air PollutionPudhari
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

राज्यात २०२१ ते २०२५ या कालावधीत श्वसनाशी संबंधित आजार असणाऱ्या रुग्णांमध्ये ४४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामध्ये अस्थमा, क्षयरोग (टीबी), सीओपीडी यांसह अन्य आजारांचा समावेश आहे. गोवा मेडिकल कॉलेजच्या (गोमेकॉ) रुग्णालयात श्वसनाशी संबंधित आजारांसाठी २०२१ मध्ये १,२०३ जणांवर उपचार करण्यात आले.

Construction Air Pollution
Yuri Alemao Goa Budget 2026 | कर्मचारी भरती रखडली की वाळपईतूनच होणार? आरोग्य खात्यातील रिक्त पदांवरून युरी आलेमाव यांचा टोला

२०२५ मध्ये ही संख्या ४३.४७ टक्क्यांनी वाढून १,७२६ झाली आहे. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी विधासभेत दिलेल्या लेखी उत्तरातून ही माहिती मिळाली आहे. याबाबत आमदार कार्ल्स फेरेरा यांनी प्रश्न उपस्थित केला होता. उत्तरात दिलेल्या माहितीनुसार, २०२१ मध्ये गोमेकॉच्या रेस्पिरेटरी मेडिसन विभागात अस्थमाच्या उपचारासाठी ९८ रुग्ण दाखल झाले होते.

२०२५ मध्ये ही संख्या वाढून २०४ झाली. याशिवाय २०२१ मध्ये सीओपीडीचे ३०९, न्युमोनियाचे १३७, एआरआयचे ३९, टीबीचे ४५४ रुग्ण दाखल झाले होते. २०२५ मध्ये सीओपीडीचे ३७१, न्युमोनियाचे ४१३, एआरआयचे १५४, टीबीचे ५२२ रुग्ण दाखल झाले होते.

२०२१ मध्ये श्वसनासंबंधित अन्य आजारांसाठी १६६ रुग्ण दाखल झाले होते. २०२५ मध्ये ही संख्या कमी होऊन ६२ झाली. वरील कालावधीत श्वसनाशी संबंधित आजारांसाठी बाह्य रुग्ण विभाग सेवा (ओपीडी) घेणाऱ्या रुग्णांमध्येदेखील वाढ झाली आहे. २०२१ मध्ये अशा आजारांसाठी ६,०७५ रुग्णांनी ओपीडी सेवा घेतली होती.

२०२५ मध्ये ९,३८८ रुग्णांनी ही सेवा घेतली. पाच वर्षांत एकूण ४० हजार २३० रुग्णांनी ओपीडी सेवा घेतली आहे. यामध्ये उत्तर गोव्यातील २८ हजार ९५१, तर दक्षिण गोव्यातील ११ हजार २७९ रुग्णांचा समावेश आहे. तालुकानिहाय पाहता तिसवाडी आणि बार्देश तालुक्यांत रुग्णांची संख्या अधिक, तर काणकोण आणि धारबांदोडा तालुक्यांत रुग्णसंख्या कमी आहे.

Construction Air Pollution
Unity Mall Goa | चिंबलचा 'युनिटी मॉल' अखेर रद्द! विधानसभेत पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांची अधिकृत माहिती

रुग्णांच्या संख्येत हवामानानुसार बदल

मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरात म्हटले आहे की, विभागाने शहरी भागात अथवा औद्योगिक क्षेत्रात श्वसनाशी संबंधित आजारांच्या ट्रेंडबाबत अभ्यास केलेला नाही. असे असले तरी असे आजार असणाऱ्या रुग्णांच्या संख्येत हवामानानुसार बदल होतात.

हिवाळ्यात अस्थमा आणि अॅलर्जिक रहीटीनीस यांच्या रुग्णांची संख्या धुके, पर्यावरणीय प्रदूषणामुळे वाढते. उन्हाळ्यात अशा आजारांची लागण होण्याचे प्रमाण तुलनेने कमी होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news