Unity Mall Goa | चिंबलचा 'युनिटी मॉल' अखेर रद्द! विधानसभेत पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांची अधिकृत माहिती

Unity Mall Goa | पर्यटन मंत्र्यांची माहिती; सभागृहाचा वेळ वाया न घालविण्याची मागणी
Rohan khawante
Rohan khawante
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

चिंबल येथे बांधण्याचे ठरलेल्या मात्र लोकांच्या विरोधानंतर रद्द केलेल्या केंद्र सरकारच्या युनिटी मॉल या प्रकल्पावर सदर प्रकल्प तेथून रद्द झालेला असतानाही आज मंगळवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला आमदार वेन्सी वियेगस यांनी युनिट मॉल संदर्भात प्रश्न विचारल्याने पर्यटनमंत्री रोहन खंवटे व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांना आक्षेप घेतला.

Rohan khawante
Yuri Alemao Goa Budget 2026 | कर्मचारी भरती रखडली की वाळपईतूनच होणार? आरोग्य खात्यातील रिक्त पदांवरून युरी आलेमाव यांचा टोला

दरम्यान, लोकभावनांचा विचार करून युनिटी मॉल प्रकल्प रद्द केल्याची माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिली. जो प्रकल्प रद्द केलेला आहे, त्यावर विधानसभेमध्ये चर्चा करून विधानसभेचा वेळ वाया घालवू नये, असे मुख्यमंत्री म्हणाले, तर मंत्री खंवटे यांनी आमदार व्हिएगस चुकीची माहिती देत असल्याचा आरोप केला.

सरकारने दोन नेटीस काढून सदर प्रकल्प रद्द केलेला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठक घेऊन तो रद्द करावा, ही आमदार वेंझी व्हिएगस यांची मागणी हास्यास्पद असल्याचे खंवटे म्हणाले. युरी आलेमाव यांनी या प्रकल्पावर २१ कोटी कसे खर्च झाले असा प्रश्न विचारुन हा खर्च केंद्र सरकार देणार आहे का, असे प्रश्न विचारला. फक्त सात कोटी रुपये विविध कामासाठी देण्यात आलेले असून, ११ कोटी रुपयांचे साहित्य आणले आहे. युनिटी मॉल दुसरीकडे बांधताना त्याचा वापर करण्याचा विचार आहे, असे खंवटे म्हणाले.

Rohan khawante
Panaji Municipal Election 2026 | पणजी महापालिका निवडणूक शांततेत

विरोधांची कारणांमध्ये सातत्याने बदल...

चिंबल येथील युनिटी मॉल हा प्रकल्प पहिल्यांदा बफर झोनमध्ये येत असल्याचे सांगून स्थानिकांनी विरोध करण्यास सुरुवात केली. तपासणी झाली आणि बफर झोन पासून ३८६ मीटर दूर हा प्रकल्प असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर रोहन खंवटेची मालमत्ता पुढे करण्यात आले. त्यावर ती जमीन आपली असल्यास दान करण्याचे खंवटे यांनी जाहीर करताच.

युनिटी मॉल प्रकल्पच नको अशी मागणी करत काही लोकांनी आंदोलन सुरू केले. विरोधकांनी त्या लोकांचे कान भरले व पंतप्रधानाचा एक चांगला प्रकल्प चिंबलमधून रद्द करावा लागला. तो प्रकल्प झाला असता तर चिंबल परिसराचा कायापालट झाला. असे खंवटे म्हणाले.

काँग्रेसशासित राज्यांत झाले युनिटी मॉल...

एक जिल्हा एक युनिटी मॉल असे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे धोरण असून स्थानिकांनी तयार केलेल्या वस्तू तेथे विकण्यास ठेवल्या जातात. काँग्रेसशासित राज्यांमध्ये ही युनिटी मॉल झाले आहेत. गोव्यामध्ये मात्र काँग्रेसने या

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news