गोवा : सुर्ला येथे ७० लाखांची जलवाहिनी जाळली

गोवा : सुर्ला येथे ७० लाखांची जलवाहिनी जाळली
Published on
Updated on

डिचोली; पुढारी वृत्तसेवा : साखळी मतदारसंघाली सुर्ला पंचायत क्षेत्रातील शेतकर्‍यांना पाण्याची समस्या निर्माण होत असल्याने शेतकर्‍यांसाठी स्थनिक आमदार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मायनिंग पीठातून पाणी उपलब्ध करून देण्याचा सरकारने एक नवीन प्रकल्प राबवला आहे, तो पूर्णत्वास येत असताच काही अज्ञातांनी 70 लाख रुपये किमतीची पाईप जाळून टाकण्याची घटना नुकतीच आमेफाळ कात्रे येथे घडली. यामुळे सरकारच्या संबंधित खात्याचे नुकसान झाले आहे.

या घटनेचा सुर्ला गावातील शेतकर्‍यांनी संघटित होऊन यावर चर्चा केली. नुकसानीचा अंदाज घेतला. यावेळी सरपंच विश्रांती सुर्लकर, उपसरपंच भोला खोडगीणकर, पंच सुभाष फोंडेकर, बाबलो नाटेकर, ओंकार केळकर, सुर्ला सोसायटी चेअरमन उदय नाटेकर, मनोहर वळवईकर, आनंद फोंडेकर, विष्णू वळवईकर, वसंत कालेकर, कालिदास बर्वे, हरी मराठे, अशोक खोडगिणकर आदींची उपस्थिती होती.

काही विघ्न निर्माण करणारी माणसे विरोधाला विरोध म्हणून गावातील विविध सामाजिक प्रकल्पांना विरोध करतात. मात्र, शेतकर्‍यांना उपयुक्त अशा प्रकल्पाचे नुकसान करणार्‍यांना कोणी गावातील नागरिकांनी हे कृत्य केले आहे, त्यांनी आताच समोर यावे; अन्यथा याविषयी कठोर कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी पंचायत मंडळने पुढाकार घेतला असून जर कोणी बाहेरची माणसे असल्याचे समजले तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. सरकारच्या संबंधित अधिकार्‍यांनी या विषयावर कडक पाऊले उचलण्याची आवश्यकता असल्याचे मत सरपंच विश्रांती सुर्लकर यांनी यावेळी व्यक्त केले.

सरकारने कोटी रुपये खर्च करून 2012 पासून हा प्रकल्प हाती घेतला आहे. मात्र, तो पूर्णत्वास आल्यावर असे नुकसान करून बंद पाडण्याचा ज्यांनी प्रयत्न केला, हे दुर्दैवी आहे. सरकारने या प्रकरणी कठोर कारवाई करावी, अशी मागणी बाबलो नाटेकर यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news