गोवा : प्राथमिक शिक्षक भरती परीक्षा 17 ला होणार | पुढारी

गोवा : प्राथमिक शिक्षक भरती परीक्षा 17 ला होणार

पर्वरी; पुढारी वृत्तसेवा : शिक्षण संचालनालयाने 142 प्राथमिक शिक्षक भरती करण्यासाठीची लेखी परीक्षा 17 डिसेंबर रोजी कुजिरा येथील तीन शाळांमध्ये आणि ताळगाव येथील सेंट मायकल हायस्कूलमध्ये दुपारी 2.30 ते 5,30 या दरम्यान घेण्यात येणार आहे. तसेच 70 कनिष्ठ लिपिक परीक्षा ता. 18 डिसेंबर रोजी 29 केंद्रांवर घेण्यात येणार आहे. सर्व उमेदवारांनी लेखी परीक्षेसाठी उपस्थित राहावे, असे शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी पत्रकार परिषद घेऊन कळविले आहे. यावेळी त्यांच्या समवेत समग्र शिक्षाचे उपसंचालक शंभू घाडी उपस्थित होते.

सर्व उमेदवारांनी लेखी परीक्षेसाठी येताना कॉल लेटर,ओळख पत्र आणि आवश्यक शिक्षण पात्रता प्रमाणपत्रे बरोबर आणणे बंधनकारक आहे. या प्राथमिक शिक्षक पदासाठी शिक्षणशास्त्र पदवी(इ.एऊ.) परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार पात्र नाहीत. 142 प्राथमिक शिक्षक भरतीसाठी 2073 उमेदवारांनी अर्ज केले असून, त्यातील 383 उमेदवारांनी प्राथमिक शिक्षक पदवी परीक्षा पास केल्याचे अर्जात नमूद केले आहे.हा अभ्यासक्रम गोव्यात शिकवीला जात नसून त्यासाठी या उमेदवाराची लेखी परीक्षेपूर्वी प्रमाणपत्रे तपासूनच त्यांना प्रवेश दिला जाईल. जर ते पात्र असेल तरच त्यांना लेखी परीक्षा देता येईल असे संचालक झिंगडे यांनी सांगितले.

ता. 18 रोजी होणार्‍या 70 लिपिख भरती पदासाठी 10769 उमेदवारानी अर्ज केले आहेत. सदर परीक्षा 29 केंद्रावर घेण्यात येणार आहेत. सर्व पदे कायमस्वरूपची आहेत. दोन वर्षाचा सेवाकाळ पूर्ण केल्यावर त्यांना नोकरीत कायम करण्यात येणार आहेत. ही भरती प्रक्रिया ऑन लाईन पद्धतीने ता.2 डिसेंबर 2021 ते 17 डिसेंबर 2021 या दरम्यान पूर्ण करण्यात आली होती. असे संचालक झिंगडे यांनी सांगितले.

Back to top button