गोवा : पुण्याचा निहाल बेग ‘आयर्न मॅन’चा विजेता | पुढारी

गोवा : पुण्याचा निहाल बेग ‘आयर्न मॅन’चा विजेता

पणजी;  पुढारी वृत्तसेवा :  पुण्यातील एरोस्पेस अभियंता निहाल बेग (28) याने रविवारी (दि.13) पणजी येथे झालेल्या आयर्नमॅन 70.3 गोवा ची दुसरी आवृत्ती जिंकली. त्याने भारतीय सैन्याचा गतविजेत्या बिस्वरजित सायखोमचा पराभव केला. या स्पर्धेत एकूण 1450 ट्रायथलीट सहभागी झाले होते. ज्यात 1.9 कि.मी. खुल्या समुद्रात पोहणे, 90 किमी सायकलिंग आणि 21 कि.मी. धावणे साडेआठ तासांत पूर्ण होणार आहे.

खुल्या पाण्यात पोहणे (1.9 कि.मी.) आणि 90 कि.मी. सायकलिंगमध्ये पिछाडीवर पडल्यानंतर बेगने 21 कि.मी. धावण्याच्या शेवटच्या 7 कि.मी.मध्ये सायखोमला मागे टाकले. एकूण 4 तास 29 मिनिटे आणि 45 सेकंदांच्या प्रभावी वेळेसह प्रथम क्रमांक पटकावल्यानंतर आनंदीत झालेले बेग म्हणाले, गेल्या वेळी मी आयर्न मॅन 70.3 गोवाच्या पहिल्या आवृत्तीत दुसरे स्थान पटकावले होते, त्यामुळे यावेळी सायखोमच्या पुढे पूर्ण करणे चांगले वाटते.

दरम्यान, बिस्वरजितने 04:37:21 वेळ नोंदवून एकूण दुसरे, तर दिल्लीच्या 40 वर्षीय पंकज धीमानने 04:40:41 सेकंदांसह तिसरे स्थान पटकावले. . महिलांमध्ये स्वित्झर्लंडच्या कॅटजिन शिअरबीकने 05:10:46 वेळेसह प्रथम, बेंगळुरूच्या टिमटिम शर्माने 05:23:21 वेळेसह दुसरे आणि मुंबईच्या केतकी साठेने 05:46:51 वेळेसह तिसरे स्थान पटकावले.

टिमटिम म्हणाली की, गोव्यातील वातावरण खूप गरम होते आणि हा एक कठीण कोर्स होता, विशेषतः धावणे. आम्ही सायकल चालवली, तेव्हा थोडासा वाराही आला. पण, एकंदरीत ही एक उत्तम शर्यत होती. रीलेमध्ये योस्काच्या आझादी का अमृत महोत्सव उपक्रमाचा भाग म्हणून भारतीय हवाई दलाने तयार केलेल्या संघांनी अव्वल तीन स्थान पटकावले. टी आय अ‍ॅडव्हेंचरने 04:29:02 वेळेसह प्रथम, टी सर्व्हिसेस 04:32:22 वेळेसह आणि तिसरे स्थान टीआयएएफ संघ (04:32:28) ला मिळाले.

गेल्या दशकापासून गोव्यातील ट्रायथलॉन शर्यतींमध्ये नियमितपणे सहभागी होणारा स्विस नागरिक, पाब्लो एराट (51), एकूण सहाव्या क्रमांकावर आहे. पाब्लो म्हणाले, गोवा हे माझे दुसरे घर आहे आणि मला येथील वातावरण आवडते.

प्रथम दहा क्रमांक पुरुष

1.निहाल बेग (भारत) 04:29:45
2. बिश्वरजित सायखोम (भारत) 04:37:21
3. पंकज धीमान (भारत) 04:40:41
4. पी रावलू (भारत) 04:41:36
5.ए कंदीकुप्पा (सिंगापूर) 04:42:50
6. पाब्लो एरात (स्वित्झर्लंड) 04:44:25
7.मार्सेल किंग (बेल्जियम) 04:45:23
8.चडअराफत (बांगलादेश) 04:52:14
9.फराई दलू (झिम्बाब्वे) 05:00:46
10.उज्ज्वल आनंद (भारत) 05:01:39

प्रथम पाच महिला

1.कॅटजिन शिअरबीक (स्वित्झर्लंड) 05:10:46
2. टिमटिम शर्मा (भारत) 05:23:21
3.केतकी साठे (भारत) 05:46:51
4. श्रीवाणी वायवी (भारत) 06:07:39
5. सुयिन ओंग (भारत) 06:14:23

Back to top button