Margao Accident Case | दुचाकी अपघातात मृत फिटनेस ट्रेनरच्या आईला 36.84 लाखांची भरपाई

Margao Accident Case | मोटार अपघात दावा प्राधिकरणाचा निर्णय
Accident
Accidentfile photo
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा
दक्षिण गोव्यातील मडगाव मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने दुचाकी अपघातात मृत्यू झालेल्या ३३ वर्षीय व्हॅलेंटाईन बॅरेटो यांच्या आईला ३६ लाख ८४ हजार ७०० रुपयांची भरपाई मंजूर केली आहे. या रक्कमेवर अर्ज दाखल केल्याच्या तारखेपासून वार्षिक ६.८ टक्के व्याज देण्याचे निर्देश न्यायाधिकरणाचे सदस्य राम प्रभुदेसाई यांनी दिले.

Accident
Babush Monserrate Panjim | मी पणजी सोडून कुठेही जाणार नाही! सांताक्रूझमधून लढण्याच्या चर्चांवर बाबूश मोन्सेरात यांचा पूर्णविराम

हा अपघात काणकोणमधील लोलयें येथे झाला होता. व्हॅलेंटाईन बॅरेटो हे दुचाकीवर मागे बसले होते, तर २२ वर्षीय अँथनी फर्नांडिस दुचाकी चालवत होता. समोरून येणाऱ्या ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करताना अँथनीचा दुचाकीवरील ताबा सुटला. दुचाकी रस्त्यालगतच्या दगडावर आदळल्यानंतर दोन्ही प्रवासी बाजूच्या झाडींमध्ये फेकले गेले.

या अपघातात व्हॅलेंटाईन यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात हेड काॉन्स्टेबल दीपक गावकर यांच्या साक्षीचा न्यायाधिकरणाने आधार घेतला. दुचाकी चुकीच्या बाजूने चालवणे आणि निष्काळजीपणे वाहन चालवणे हे अपघाताचे प्रमुख कारण असल्याचे न्यायाधिकरणाने नमूद केले.

Accident
ST Political Reservation | "एसटी राजकीय आरक्षणासाठी 13 ऑगस्टला 'चलो पणजी'! 'उटा' संघटनेचा सरकारला थेट इशारा"

मोटार अपघात भरपाईच्या दाव्यात गुन्हेगारी खटल्याप्रमाणे दोष संशयाच्या पलीकडे सिद्ध करणे आवश्यक नसते, असेही न्यायाधिकरणाने स्पष्ट केले. व्हॅलेंटाईन हे काणकोण येथील नॉबटर्स फिटनेस स्टुडिओ येथे फिटनेस ट्रेनर म्हणून कार्यरत होते. त्यांना दरमहा २५ हजार रुपये वेतन मिळत होते.

त्यांच्या उत्पन्नाच्या आधारे भरपाईची रक्कम निश्चित करण्यात आली.
न्यायाधिकरणाने दुचाकी चालक अँथनी फर्नांडिस आणि आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी यांना संयुक्तपणे भरपाईची रक्कम जमा करण्याचे आदेश दिले आहेत. ही रक्कम जिल्हा न्यायालयाच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news