गोवा : बामणबुडो धबधबा परिसरात सापडला अज्ञात व्यक्तीचा सांगाडा | पुढारी

गोवा : बामणबुडो धबधबा परिसरात सापडला अज्ञात व्यक्तीचा सांगाडा

मडगाव, पुढारी वृत्तसेवा : आंबेघाटच्या प्रसिद्ध बामणबुडो धबधबा परिसरात एका अज्ञात व्यक्तीचा पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेतील सांगाडा मिळाला आहे. खून करुन या ठिकाणी हा सांगाडा आणून टाकल्याचा अंदाज आहे. बुधवारी (दि.५) उशिरा हा सांगाडा या धबधबा परिसरात आढळून आला. तो सांगाडा स्त्रीचा आहे की, पुरुषाचा हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. बऱ्याच दिवसांपूर्वी त्या व्यक्तीचे निधन झाल्याचे प्रथमदर्शनी तपासात आढळून आले आहे.

केपे पोलिसांनी सदर मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. आंबेघाट हा अतिशय जंगलाचा भाग आहे. तेथेच बामणबुडो नावाचा एक धबधबा सुध्दा आहे. डोंगरातील या वाटेने नेत्रावळीतुन खोतीगाव मार्गे काणकोण येथे जाता येते. धबधबा परिसरात पर्यटकांचीही वर्दळ असते. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. केपे पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button