पणजी : मिरामार किनार्‍यावर ट्रॉलर बुडाला; खलाशी बचावले | पुढारी

पणजी : मिरामार किनार्‍यावर ट्रॉलर बुडाला; खलाशी बचावले

पणजी : पुढारी वृत्तसेवा : मासे पकडून परतणारा ट्रॉलर शुक्रवारी सकाळी मिरमार किनार्‍यावर बुडाला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ट्रॉलरवरील खलाशांनी पोहून किनारा गाठला. सकाळी 11.30 च्या सुमारास घडलेल्या या घटनेत 31 खलाशी सुखरूपपणे किनार्‍यावर पोहोचले.

मिळालेल्या माहितीनुसार, मासेमारी करून माळीम जेटीकडे परतणारा हा ट्रॉलर मिरामारजवळ आल्यावर बुडू लागला. हे लक्षात येताच खलाशांनी पटापट समुद्रात उड्या टाकल्या. किनार्‍यावर पोहोचल्यावर त्यांनी दोरीच्या सहाय्याने बोटीवरील सामना बाहेर काढले.

वाचा : 

Back to top button