गोवा : खुन्याने दिले होते पोलिसांना फिटनेस प्रशिक्षण | पुढारी

गोवा : खुन्याने दिले होते पोलिसांना फिटनेस प्रशिक्षण

पणजी;  पुढारी वृत्तसेवा :  प्राध्यापिका गौरी आचारी हिचा एकतर्फी प्रेमातून खून केल्याच्या आरोपाखाली तुरुंगात असलेला फिटनेस ट्रेनर गौरव बोंद्रे याने खून करण्यापूर्वी गोव्याच्या दहशतवादी विरोधी पथकातील कमांडोना महिनाभर फिटनेस प्रशिक्षण दिले होते. हा प्रकार आता उघड झाला आहे.

महाराष्ट्रात एका महिलेचा विनयभंग त्याने केला होता. त्या प्रकरणात तो जामिनावर सुटला होता. त्याला महाराष्ट्रात कोण जवळ करत नसल्याने त्याने गोव्यात येऊन फिटनेस जीम सुरू केला होता. गौरी त्याच्या जीममध्ये जात होत्या. त्यावेळी बोंद्रे याचे तिच्यावर एकतर्फी प्रेम बसले होते, मात्र गौैरीकडून प्रतिसाद मिळत नसल्याने त्याने तिचा खून केला होता. या प्रकारानंतर महाराष्ट्रात त्याने केलेल्या विनयभंगाचा प्रकार सर्वांना कळला होता. मात्र गोव्यात आल्यानंतर काही महिन्यांनी बोंद्रे याने दहशतवादी विरोधी पथकातील कमांडोना प्रशिक्षण दिले होते हे आता उघड झाले आहे. प्रशिक्षकम्हणून सेवा घेण्यापूर्वी गोवा पोलिसांनी त्याच्या मागील पार्श्वभूमीची काहीच तपासणी केली नव्हती असेही आता स्पष्ट झाले आहे.

Back to top button