गोवा : अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

गोवा : अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

वास्को; पुढारी वृत्तसेवा : येथील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार केल्याप्रकरणी वास्को पोलिसांनी एका चालकासह चौघांना अटक केली. या चौघा संशयितांनी तिच्यावर वेगवेगळ्या कालावधीत बलात्कार केल्याचे उघडकीस आले आहे. संशयिताविरुद्ध भा.दं.स. 363, गोवा बाल कायद्याअंतर्गत 8 खाली तसेच 374 – आर/डब्ल्यू,4 (अ)12 पोस्को कायद्यांतर्गत गुन्हे नोंद केले आहेत.

वास्को पोलिसांनी अपहरण व बलात्कारप्रकरणी अटक केलेल्या संशयितांची नावे मुकुंद रावळ (वय 35), गुरूव्यंकटेश गुरूस्वामी (30), कुश जयस्वाल (30), अफतार हुसैन (23, सर्व रा. वास्को) अशी आहेत.
वास्को पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मुलगी बेपत्ता असल्याची तिच्या आईने 11 रोजी वास्को पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत अपहरणाचा गुन्हा नोंद करून चौकशी सुरू केली. त्या मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिस पथके तयार केली. तपास करताना 16 ऑगस्टला ती अल्पवयीन मुलगी कुठे आहे, याचा सुगावा लागला. त्यामुळे तिला ताब्यात घेण्यात आले. सामाजिक संस्थेच्या पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत तिचा जबाब नोंदविण्यात आला.

पोलिस निरीक्षक कपिल नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अवघ्या दोन तासांमध्ये संशयित चौघांच्या मुसक्या आवळल्या. त्या चौघांपैकी एका ओळखीच्या चालकाने
ती अल्पवयीन असल्याचा गैरफायदा घेत ऑगस्ट 2021 ला बलात्कार केला होता. त्यानंतर इतर तिघांनीही तिच्यावर बलात्कार केला.

सदर संशयितांचा तपास करण्यासाठी उपनिरीक्षक स्वप्नील नाईक, उपनिरीक्षक रोहन नागशेकर, उपनिरिक्षक मयूर सावंत यांनी निरीक्षक कपिल नायक यांच्या मार्गदर्शननखाली परिश्रम घेतले. उपअधीक्षक राजेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक कपिल नायक अधिक तपास करीत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news