गोवा : मतदान 275, मोजणी 299 मतांची | पुढारी

गोवा : मतदान 275, मोजणी 299 मतांची

मडगाव; पुढारी वृत्तसेवा :  अवेडे पंचायतीच्या प्रभाग चारमध्ये बुधवारी (दि. 10) झालेल्या मतदान प्रक्रियेत 275 मतदान झाले होते; पण शुक्रवारी मतमोजणीत 299 मतांची मतमोजणी झाली. पराभूत उमेदवारांनी या प्रक्रियेवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले. दरम्यान, मतमोजणीच्या नमुन्यात छपाईमध्ये चूक झाल्याने हा गोंधळ निर्माण झाल्याचे केपेचे निवडणूक अधिकारी प्रताप गावकर यांनी स्पष्ट केले.
अवेडे पंचायत प्रभाग चारमधून सात उमेदवार रिंगणात उतरले होते. मतदानादिवशी या प्रभागासाठी एकूण 275 मतदान झाले होते; पण मतमोजणी दिवशी हा आकडा 299 मतापर्यंत गेल्याने पराभूत उमेदवारांनी प्रक्रियेवर शंका उपस्थित करत निवडणूक अधिकार्‍यांना विचारणा केली. निवडणूक अधिकारी प्रताप गावकर यांना विचारले, असता मतमोजणीच्या नमुन्यात छापील चूक झाल्याचे त्यांनी
सांगितले.

चुकीच्या टायपिंगमुळे 29 च्या जागी 54 मते
याबाबत प्रताप गावकर यांनी सांगितले, की एका उमेदवाराने हा प्रश्न उपस्थित केल्याने मतमोजणीवेळी जे दस्तऐवज तयार केले ते आम्ही तपासून पाहिले. त्यावेळी 275 मतदान झाल्याचे स्पष्ट झाले.
मतमोजणी झाल्यानंतर एक तासाने उमेदवाराने हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यांनी फेर मतमोजणीची मागितली नव्हती, पण आपण सर्व अधिकार्‍यांसह बसून सदर प्रभागातील फेर मतमोजणी केली. त्यात रुपेश कोठंबीकर या उमेदवाराला 29 मते पडली होती, पण चुकून ती कागदपत्रांवर 54 अशी छापून आली, असे गावकर यांनी सांगितले.

Back to top button