

फोंडा; पुढारी वृत्तसेवा : खांडोळा – माशेल भागात एका इमारत संकुलातील नव्यानेच बांधलेल्या शौचालयाच्या टाकीत शुक्रवारी (दि. 6) एक गवा पडल्याने खळबळ माजली. कुणी तरी हा गवा या टाकीत पडल्याचे पाहिल्यानंतर प्राणिमित्रांना कळवले. प्राणिमित्र अमृतसिंग व इतर सहकार्यांनी येऊन या गव्याची सुटका केली.
यावेळी वन खात्याचे अधिकारीही उपस्थित होते. हा गवा रेडा खांडोळा रानातून भटकत गावात आला असावा असा कयास व्यक्त होत आहे.