गोवा : मुंबई-गोवा महामार्गावर अपघात | पुढारी

गोवा : मुंबई-गोवा महामार्गावर अपघात

खेड;  पुढारी वृत्तसेवा :   मुंबई-गोवा महामार्गावरील निगडे फाटा परिसरात भरधाव वेगातील मालवाहू टेम्पो पलटी उलटून अपघात झाला. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या अपघातात सुदैवाने मनुष्यहानी झाली नाही. मात्र गाडीतील इलेक्ट्रॉनिक सामान आणि गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

हा टेम्पो जागृत मोटर्स या ट्रान्सपोर्ट कंपनीच्या मालकीचा होता. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मुंबई येथे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू घेऊन चिपळूणकडे जायला निघाला होता. सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास हा टेम्पो निगडे गावानजीक पोहोचला. या दरम्यान टेम्पोच्या टायरचे नट सैल झाल्याने टेम्पोवरील नियंत्रण सुटले आणि तो टेम्पो रस्त्यातच उलटला. या जीवघेण्या अपघातातून चालक बचावला.मुंबई – गोवा महामार्गावर होणार्‍या अपघातांमध्ये अलीकडे पुन्हा एकदा वाढ झाल्याचे पाहावयास मिळत आहे.

भरधाव वेगातील वाहनांना अचानक ब्रेक लावण्याची वेळ आली तर भरधाव वाहने रस्त्यावर पलटी होऊन अपघात होऊ लागले आहेत. खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने काही वाहने अपघातग्रस्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर महामार्ग बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी रस्त्यावर पडलेले खड्डे ठेकेदाराकडून बुजवून घ्याव्येत, अशी मागणी होत आहे.

Back to top button