गोवा : भूखंडाच्या आमिषाने 25 लाखांचा गंडा | पुढारी

गोवा : भूखंडाच्या आमिषाने 25 लाखांचा गंडा

पणजी; पुढारी वृत्तसेवा :  बार्देश तालुक्यातील हणजूण येथे भूखंड देण्याचे आमिष दाखवून 25 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी हणजूण पोलिसांनी डॉमनिक पीटर फर्नांडिस, ज्योती ऑलिव्हिया फर्नांडिस, ब्लासिओ फर्नांडिस आणि व्हॅलेन बेला फर्नांडिस बार्रेटो या चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्वरी येथील पंकज डाब्राल यांनी हणजण पोलिसांत आपली फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली आहे. संशयितांनी पेद्रूभाट हणजूण येथील सर्व्हे क्रमांक 510/1 येथील 6 हजार चौरस मीटर भूखंड डाब्राल यांना देण्याचे कबूल केले होते. त्यासाठी संशयितांनी डाब्राल यांच्याकडून 9 ऑक्टोबर 2021 रोजी 25 लाख रुपये आगाऊ रक्कम घेतली होती. मात्र त्यानंतर संबंधित भूखंड देण्याबाबत काहीच हालचाल केली नाही. तसेच संबंधित भूखंडाबाबत 31 मे 2022 रोजी वृत्तपत्रात नोटीस छापून आल्यानंतर संशयितांनी सदर भूखंड तिसर्‍याच व्यक्तीला विक्री केल्याचे उघड झाले.

त्यानंतर पंकज डाब्राल यांनी भूखंडासाठी घेतलेली आगाऊ रक्कम परत करण्याची मागणी केली, मात्र संशयितांनी त्यांना नकार दिला. त्यामुळे डाब्राल यांना आपली फसवणूक झाल्याचे समजताच त्यांनी हणजूण पोलिस स्थानकात तक्रार नोंद केली. पोलिस निरीक्षक प्रशाल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक फ्रान्सिस झेवियर यांनी चार संशयितांविरोधात फसवणूक केल्याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 420 कलमातंर्गत गुन्हा दाखल केला.

 

Back to top button