गोवा : एलईडी पद्धतीची मासेमारी रोखा | पुढारी

गोवा : एलईडी पद्धतीची मासेमारी रोखा

पणजी; पुढारी वृत्तसेवा :  मासेमारीसाठी समुद्रात जाण्यापूर्वी बोटींची योग्य तपासणी करून त्यामध्ये एलईडी मासेमारी, बुल ट्रॉलिंग किंवा पेअर ट्रॉलिंग करणारी उपकरणे नसल्याची खात्री करून घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने मत्स्यव्यवसाय विभाग आणि किनारपट्टी पोलिसांना दिले.

एलईडी लाईट मासेमारीवर संपूर्ण आणि प्रभावी बंदी घालण्यासाठी गोवा फाऊंडेशनतर्फे दाखल केलेल्या जनहित याचिकेवर न्यायालयात बुधवारी सुनावणी झाली. यावेळी हे आदेश देण्यात आले आहेत. मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणार्‍या बोटींवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

याचिकेमध्ये राज्यातील 800 पैकी जवळपास 400 मासेमारी बोटी एलईडी मासेमारी करीत आहेत.
त्यामुळे मासे मोठ्या प्रमाणावर नष्ट होतात. त्यामुळे 60 दिवसांची मासेमारी बंदी उठण्यापूर्वी सर्व बोटींची तपासणी करण्याची विनंती याचिकेत केली आहे. न्यायालयाने मत्स्यव्यवसाय विभागाला अशा बोटींवर पाळत ठेवण्यासाठी नवीन बोटी लवकरात लवकर घ्याव्यात, असा आदेश दिला आहे.

Back to top button