गोवा : हिरवी मिरची, कारले स्वस्त; फरसबी महागच | पुढारी

गोवा : हिरवी मिरची, कारले स्वस्त; फरसबी महागच

पणजी; पुढारी वृत्तसेवा :  गेल्या आठवड्यात महाग झालेली  मिरची आता स्वस्त झाला आहे. येथील बाजारपेठेत मंगळवारी हिरवी मिरचीचा दर 40 रुपयांनी कमी होऊन तो 80 रुपये प्रती किलो होता. कारल्याचे दरही कमी झाले असून ते 80 रुपये प्रती किलो आहे. फरसबीचा दर महागच असून तो 120 रु. प्रती किलोच आहे. इतर भाज्यांचे दरही स्थिर आहेत.

गेल्या आठवड्यात 30 ते 35 रुपये असणारा टोमॅटो मंगळवारी 40 रुपये प्रती किलो होता. कांदेही 10 रुपयांनी वाढून 40 रू. प्रती किलो होते. बटाट्याचा दरही 40 रुपये प्रती किलो होता. भेंडी, ढब्बू 80 रु. तर गवार व दोडका प्रत्येकी 30 व 40 रु. प्रती किलो होती. कोबी व फ्लॉवर प्रत्येकी 40 रु. प्रती किलो होते. वांगी 60 रु, गाजर 80 रू. प्रती किलो होते. लिंबू 20 रुपयांना 7 ते 8 नग होते. काकडी 50 रुपयांना 5 होती. मेथी व कोथिंबीर प्रत्येकी 30 जुडी रू. तर कांद्याची पात 10 रू. जुडी होती.

फळांमध्ये पेरू गेल्या आठवड्याच्या तुलनेत 70 रुपयांनी कमी होऊन 130 रु. प्रती किलो झाला आहे. सीताफळ 50 रुपयांनी महाग झाले असून हा 150 रु. प्रती किलो झाला आहे. सफरचंद व डाळिंब प्रत्येकी 180 रु. प्रती किलो, संत्री 160 रु. तर मोसंबी 100 रु. प्रती किलो आहे. केळी 60 रु. डझन, अननस 70 ते 100 रु. किलो तर कलिंगड 20 रु. प्रती किलो आहे.

भाजी दर (रु. प्रती किलो)
कांदे 40
बटाटे 40
टोमॅटो 40
फरसबी 120
कोबी 40
फ्लॉवर 40
वांगी 60
भेंडी 80
ढब्बू 80
गाजर 80
गवार 30
दोडका 40
कारले 80
मिर्ची 80
मेथी 30(जुडी)
कोथिंबीर 30(जुडी)

Back to top button