अहो, तेव्हा तुम्हीच मंत्रिमंडळात होता : मंत्री सुदिन ढवळीकर | पुढारी

अहो, तेव्हा तुम्हीच मंत्रिमंडळात होता : मंत्री सुदिन ढवळीकर

पणजी;  पुढारी वृत्तसेवा :  मायकल लोबो मंत्री असताना मंत्रिमंडळ बैठकीत साळगाव येथील वीज उपकेंद्र प्रकल्पाची निविदा रद्द केली होती. मात्र आता तेच लोबो आपणाला ती निविदा का रद्द केली, असा प्रश्‍न का विचारत आहेत असा प्रश्‍न वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी लोबो यांना विचारून सभागृहाला अवाक केले.

प्रश्‍नोत्तराच्या तासाला आमदार मायकल लोबो यांनी बार्देशमधील किनारपट्टी भागात वीज पुरवठा सुरळीत होत नाही. दिवसाला 20 वेळा वीज जाते असा मुद्दा उपस्थित केला होता व आपण मंत्री असताना सब स्टेशनसाठी काढलेली निविदा रद्द का केली असा प्रश्‍न विचारला. त्यावर त्या मंत्रिमंडळ बैठकीला तुम्ही होता. ती निविदा का रद्द केली ते तुम्हाला माहीत आहे असे ढवळीकर म्हणाले व त्या प्रकल्प फेरनिविदा तीही वाढीव रक्कमेची आचारसंहिता संपल्यानंतर काढण्यात येणार असून डिसेंबर 2022 पर्यंत सदर प्रकल्प कार्यन्वित होईल. असे आश्‍वासन ढवळीकर यांनी लोबो यांना दिले.

यावेळी आमदार डिलायला लोबो यांनी पेडण्यााला नेलेले सबस्टेशन पुन्हा म्हापशाला आणायची मागणी केली. तर सुदिन ढवळीकर यांनी यापूर्वी 24 तास पाण़ी देण्याचे आश्‍वासन दिले होते आज वीज 24 तास देण्याचे उगाच आश्‍वासन देऊ नये असा टोला आलेक्स रेजिनाल्ड यांनी लगावला. आमदार केदार नाईक यांनी साळगावची वीज समस्या सोडवण्याची मागणी केली. तर आलेक्स सिक्वेरा यांनी वीज खात्यात कंत्राटी पध्दतीवर अनेक वर्षे काम करणार्‍यां कर्मचार्‍यांना सेवेत कायम घेण्याची मागणी केली.

केंद्राचे 1640 कोटींचे वीज प्रकल्प
राज्यातील उद्योगाना पुरेसी वीज मिळत नसल्याने ते बंद होत आहेत. त्यांना पुरेसी वीज पुरवा, साखवाळ येथे मोठे ट्रान्सफॉर्मर टाका अशी विजय सरदेसाई यांनी केली. त्यावर बोलताना वीजमंत्री ढवळीकर यांनी येत्या काही दिवसात औद्योगिक वसाहतीसाठी नवे ट्रान्सफॉर्मर बसवले जातील. त्यासाठी केंद्र सरकारने 1640 कोटींचे प्रकल्प गोव्याला देऊ केले आहेत. अशी माहिती दिली. तसेच गोव्यातील विजेची वाढती गरज पुरवण्यासाठी तमनार प्रकल्पाची गरज असल्याचे सांगितले.

Back to top button