गोवा : राज्यातील वीजदरात वाढ; घरगुती वापर प्रति युनिट 5 पैशांनी महाग | पुढारी

गोवा : राज्यातील वीजदरात वाढ; घरगुती वापर प्रति युनिट 5 पैशांनी महाग

पणजी; पुढारी वृत्तसेवा : गोव्यात वीज दरात वाढ केली आहे. वीज खात्याने काढलेल्या अधिसूचनेनुसार घरगुती वापरातील विजेसाठी प्रति युनिट 5 पैसे, तसेच उच्च दाब घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वापरासाठीच्या विजेवर प्रति युनिट 8 पैसे वाढ केली आहे.

वीज साधन – सुविधा, व्यवस्थापनावरील वाढता खर्च विचारात घेऊन वीज खात्याने ही प्रति युनिट वीज दरात काहीशी वाढ केली आहे. त्याची अंमलबजावणी 1 जूनपासून सुरू झाली आहे. घरगुती वापरातील कमी दाबाच्या विजेसाठी प्रति युनिट 5 पैसे वाढ झालेली आहे. व्यावसायिक वापरात येणार्‍या विजेसाठी प्रति युनिट 8 पैसे वाढविले आहेत. म्हणजेच घरगुती विजेवर ज्यांचा सरासरी महिना 300 युनिटचा वापर होतो, त्यांच्यावर प्रति महिना 15 रुपये अधिक अधिभार बसेल. दारिद्य्र रेषेखालील (बीपीएल) ग्राहकांना या दरवाढीतून वगळले आहे. तसेच कृषी उद्देशाने होणार्‍या वीज वापरासाठी 5 पैसे प्रति युनिट वाढ झाली आहे.

Back to top button