गोवा : को. रे.चा विद्युतीकरण मार्ग देशाला समर्पित | पुढारी

गोवा : को. रे.चा विद्युतीकरण मार्ग देशाला समर्पित

मडगाव, पुढारी वृत्तसेवा : कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन करून हा प्रकल्प देशाला समर्पित करण्यात आला. मडगाव येथील रेल्वेस्थानकावरही विशेष कार्यक्रमाचे आयोजन करत व्हर्च्युअल पद्धतीने पंतप्रधानांकडून हिरवा झेंडा दाखवण्यात आल्यानंतर विजेवर चालणारी मालवाहू गाडीने मार्गक्रमण केले.

यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, मंत्री नीलेश काब्राल, खासदार विनय तेंडुलकर, आमदार दिगंबर कामत, आमदार उल्हास तुयेकर, कोकण रेल्वेचे अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
कोकण रेल्वेचे विद्युतीकरण करण्यात आल्याने इंधनावरील खर्चात घट होणार आहे व प्रदूषणमुक्त प्रवास होणार आहे. याचा फायदा कोकण रेल्वे व लोकांनाही होणार आहे. याप्रमाणे गैरसमज दूर करून लोकांनी रेल्वे दुपदरीकरणासही पाठिंबा दिला पाहिजे. विकास करताना एका बाजूने नुकसान होत असले तरी दहा बाजूने फायदा होणार आहे, याची जाणीव ठेवली पाहिजे, असे उद‍्गार केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी काढले.

Back to top button