वास्को, दाबोळीत ई-श्रम कार्डचे वाटप | पुढारी

वास्को, दाबोळीत ई-श्रम कार्डचे वाटप

वास्को : पुढारी वृत्तसेवा; वास्को व दाबोळी भाजपा मंडळांनी असंघटीत क्षेत्रांतील लोकांना ई-श्रम कार्डांचे वाटप केले. मांगोर स्पोर्टस् क्लबच्या आवारात आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला वाहतूक मंत्री मावीन गुदिन्हो यांच्या उपस्थित हा कार्यक्रम झाला.

वास्कोचे आमदार कृष्णा साळकर, वास्को भाजप मंडळ अध्यक्ष दीपक नाईक, जिल्हा परिषद सदस्य अनिता थोरात, नगरसेवक शमी साळकर, गिरीष बोरकर, रवींद्र भवनाचे अध्यक्ष जयंत जाधव, प्रशांत नार्वेकर, रुपेश पालयेकर आदी उपस्थित होते. असंघटीत क्षेत्रातील व स्थलंतरित कामगारांनी ई-श्रम कार्डांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री गुदिन्हो यांनी केले. त्यांना लाभ मिळावा म्हणून या कार्डाचे वाटप करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. आमदार साळकर यांनी सरकारच्या योजना व त्याचे लाभ समाजातील तळागाळाच्या व गरीब घटकांपर्यंत पोहचण्याची गरज असल्याचे सांगितले. याप्रसंगी दीपक नाईक, जयंत जाधव यांनी विचार मांडले.

Back to top button