पणजी कोरोना : सावधान दिवसभरात 102 रूग्ण | पुढारी

पणजी कोरोना : सावधान दिवसभरात 102 रूग्ण

पणजी : पुढारी वृत्तसेवा ; राज्यात अडीच महिन्यानंतर दि.16 रोजी दुसर्‍यांदा शंंभर पेक्षा जास्त नवे कोरोना बाधीत सापडले आहेत. गेल्या अडीच महिन्यात 50 पेक्षा कमी नवे बाधीत दररोज मिळत होते, मात्र पावसाळा सुरू झाल्यानंतर ही संख्या वाढत आहे. दोन दिवसापूर्वी 102 नवे कोरोना बाधीत सापडले होते. आज तब्बल 112 नवे कोरोना बाधीत सापडले. त्यामुळे राज्यात कोरोना पुन्हा डोके वर काढतो की काय असा संशय निर्माण झाला आहे.

आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज 1 हजार 225 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. जाहीर अहवालानुसार गुरूवारी 112 नवे कोरोना बाधीत सापडले तर 67 बरे झाले. त्यामुळे सक्रिय कोरोना बाधितांची संख्या 614 वर पोचली आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे कोरोना बाधितांचे मृत्यू थांबले आहेत.

Back to top button