हणजुणेत आणखी एक स्पा सील | पुढारी

हणजुणेत आणखी एक स्पा सील

हणजुणे : पुढारी वृत्तसेवा उत्तर गोव्यातील आणखी एक बेकायदेशीर स्पा सील करण्यात आला आहे. म्हापसाचे विभागीय पोलीस अधिकारी तथा उपअधीक्षक जीवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी मामू हागे यांनी परवानगी दिल्यानंतर हणजुणे येथील स्पा सील करण्यात आला.

हणजूणे येथील अल्गा सेंटर फॉर आयुर्वेदिक आणि हिलिंग नावाच्या बेकायदेशीरपणे कार्यरत स्पावर छापा टाकला होता. त्यानंतर पोलिस स्टेशनने सादर केलेल्या अहवालाच्या आधारे स्पा सील करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मामू हागे यांनी मंगळवारी दिले.

हेही वाचा

Back to top button