

पणजी : पुढारी वृत्तसेवा
बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणी जामिनावर असलेेले बिलीवर्सचे पास्टर डॉम्निक डिसोझा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. काही वर्षांपूर्वी माफ केलेला त्यांच्या महागड्या कारचा 9 लाख 87 हजार रस्ता कर त्यांना भरावा लागणार आहे. वाहतूक खात्याने त्यांनी खरेदी केलेल्या मर्सीडीज कारचा माफ केलेला टॅक्स त्वरित भरण्याचे आदेश डिसोझा यांना दिले आहेत.
2016 साली तत्कालीन सरकारने डिसोझा यांनी खरेदी केलेल्या महागड्या मर्सिडीज कारचा रस्ता कर सुमारे 9 लाख 87 हजार माफ केला होता. तो कर माफ करण्याचा निर्णय रद्द करून सदर रक्कम वसूल करावी, असे आदेश वाहतूक खात्याने दिले आहेत. त्यानंतर वाहतूक खात्याने सदर रस्ता कर प्रकरणी कारणे दाखवा नोटीसही डॉम्निक डिसोझा यांना पाठवली आहे. दरम्यान, बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणी जामिनावर असलेेले पास्टर डॉम्निक डिसोझा हे त्यांना ताप आल्याच्या कारणामुळे खासगी रुग्णालयात दाखल झाले आहेत. मंगळवारी, दि.7 रोजी संध्याकाळी ते रुग्णालयात दाखल झाले.