पर्वरी : बारावीत मुलीच अव्वल | पुढारी

पर्वरी : बारावीत मुलीच अव्वल

पर्वरी : पुढारी वृत्तसेवा
गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या मार्च 2022 बारावीच्या परीक्षेचा निकाल 92 .66 टक्के लागला असून 18,112 पैकी 16,783 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाही उत्तीर्ण टक्केवारीत मुलींनी बाजी मारली आहे. मुलींची टक्केवारी 94.58, तर मुलांची टक्केवारी 90.66 इतकी आहे.

यावर्षी या परीक्षेत 18,112 इतके विद्यार्थी परीक्षेत बसले होते. त्यातील 16,783 इतके विद्यार्थी पास झाले.105 विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. यावर्षी 8,861 पैकी 8,033 इतके मुलगे पास झाले. त्यांची टक्केवारी 90.66 इतकी आहे. तर 9251 पैकी 8750 इतक्या मुली पास झाल्या. त्यांची टक्केवारी 94.58 इतकी आहे.

यंदा कोरोना संकटामुळे मंडळाने प्रथमच बारावीची परीक्षा डिसेंबर 21 आणि एप्रिल 22 अशा दोन सत्रामध्ये घेण्यात आली होती.यावर्षी दोन्ही सत्राचे पन्नास पन्नास टक्के आणि अंतर्गत मुल्यांकनाचे गुण एकत्र करून गुणपत्रक तयार करण्यात आल्याची माहिती गोवा माध्यमिक व उच्च अमाध्यामिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी आज येथील शिक्षण संचालनालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत हा निकाल जाहीर करताना दिली .यावेळी सचिव गेराल्डीना मेंडीस सहसचिव शीतल कदम व भारत चोपडे उपस्थित होते.यंदा 21 विद्यार्थी खाजगी विद्यार्थी बसले होते. त्यातील 8 विद्यार्थी पास झाले तर 6 विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. आय टी आय 26 विद्यार्थी बसले होते त्यातील 18 विद्यार्थी पास झाले तर 7 विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. नापास विद्यार्थी 30 बसले होते त्यातील 19 पास झाले आहेत. 5 विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे. दिव्यांग विद्यार्थी 108 बसले होते. त्यातील 94 विद्यार्थी पास झाले आहेत. एनएसक्यु विषय घेऊन बसलेले 1166 विद्ययार्थयापैकी 1099 पास झाले आहेत.

यंदाच्या बारावीच्या परीक्षेत सर्वसामान्य गटातील 93.03 टक्के ,मागास वर्गातील 92.35 टक्के ,अनिसुचीत जातीतील 90.53 टक्के तर अनुसूचित जमातीतील 91.26 टक्के विद्यार्थी पास झाले आहेत. खेळात प्राविण्य मिळाल्यामुळे 349 विद्यार्थ्याना गुण देण्यात आले . पण प्रत्यक्षात त्यातील 9 विद्यार्थी पास झाले आहेत. कला शाखेचा 95.68 टक्के निकाल लागला असून .( 4700 विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यातील 4497 पास झाले आहेत 178 नापास झाले आहेत तर 4 विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवला आहे. ) वाणिज्य शाखेचा 95 .71 टक्के निकाल लागला आहे.( 5484 विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यातील 5249 पास झाले 204 नापास झाले आहेत.40 विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवला आहे.) विज्ञान शाखेचा 93 .95 टक्के निकाल लागला आहे. .( 5062 विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यातील 4756 3 पास झाले 296 नापास झाले तर एका विद्यार्थ्याचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे.) व्यावसायीक शाखेचा 79.04 टक्के निकाल लागला आहे. ( 2866 विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यातील 2281 पास झाले 546 नापास झाले आहेत तर 39 विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे. ), गेल्या पाच वर्षांचा निकाल 2017 — 88.78 टक्के , 2018 —- 85.84 टक्के, 2019 —– 89. 59, 2020 — 89.27,2021 — 99.40 टक्के असा आहे.

पुरवणी परीक्षा 24 जून 2022 रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष भागीरथ शेटये यांनी दिली आहे.

  • तिसवाडी तालुक्याचा सर्वाधिक 95.92 टक्के
  • केपे तालुक्याचा सर्वांत कमी 86.23 टक्के
  • मागील वर्षी 99.40 टक्के निकाल लागला

चार विद्यार्थ्यांचे भवितव्य समिती ठरवणार

कॉपी करताना चार विद्यार्थ्यांना पकडण्यात आले आहे. चार पैकी दोन विद्यार्थ्यांनी गंभीर गुन्हा केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडून रुपये 1000 दंड आकारण्यात आला आहे. तसेच त्यांना त्या विषयात शून्य गुण देण्यात आले आहे. त्यांना पुरवणी परीक्षा देण्यास मिळणार की नाही हे नंतर एक समिती स्थापन करून त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे.

Back to top button