पणजी : पुढारी वृत्तसेवा : गोवा विधानसभेतही आम आदमी पक्षाने एन्ट्री केली आहे. पक्षाचे बाणावलीचे उमेदवार व्हिन्सी व्हिएगस यांनी जेष्ठ नेते चर्चिल आलेमाव यांचा पराभव केला आहे. माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव यांचा पराभब केल्याने व्हिन्सी व्हिएगस जायंट किलर ठरले आहेत. तर वेळळी मतदारसंघात पक्षाचे क्रूझ सिल्वा यांनीही माजी मंत्री फिलिप नेरी रॉड्रीग्ज यांचा पराभव केला आहे.
गोवा विधानसभा निवडणुकीत यावर्षी प्रथमच रोव्हॉल्युशनरी गोवन्स या पक्षाने आपले उमेदवार उभे केले होते. या पक्षाचे उमेदवार विरेश बोरकर हे सांतआंद्रे मतदारसंघातून विजयी झाले आहेत. ते सर्वात तरुण उमेदवार ठरले आहेत. ते २८ वर्षांचे आहेत. विरेश यांनी तीनवेळा आमदार राहिलेल्या फ्रान्सिस सिल्व्हेरा यांचा प्रभाव केला आहे. सिल्व्हेरा यांच्यासाठी हा मोठा धक्कादायक पराभव ठरला आहे. आरजीला मात्र पहिल्यांच प्रयत्नात खाते उघडण्यात यश आले आहे.
राज्यात भाजपची सत्ता येणार असल्याचे निश्चित होताच राज्यपाल पी. एस श्रीधरन पिल्लई यांची भेट मागितली आहे. सध्याचे चित्र पाहता भाजपाला बहुमत मिळणार असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात भाजपचे सरकार स्थापन होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यादृष्टीने पावले टाकण्यास भाजपाने सुरुवात केली आहे. तसेच भाजपचे वाळपई मतदारसंघाचे विजयी उमेदवार विश्वजित राणे देखील गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत.
हे ही वाचलं का ?