Goa Election Update : सांगे मतदारसंघातून सावित्री कवळेकर आघाडीवर

Goa Election Update : सांगे मतदारसंघातून सावित्री कवळेकर आघाडीवर

मडगाव : पुढारी वृत्तसेवा : सांगे मतदारसंघातून अपक्ष उमेदवार आणि बाबू कवळेकर यांच्या पत्नी सावित्री कवळेकर भाजपच्या सुभाष फळदेसाई यांच्यापासून १३७ मतांनी आघाडीवर आहे.

मतमोजणीची पहिली फेरी सध्या सुरू आहे, ज्यात काँग्रेसचे उमेदवार प्रसाद गावकर यांना ५९९ मते प्राप्त झालेली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार सावित्री यांना १२९८ सुभाष यांना ११६१ प्रसाद गावकर यांना ५९९ अशी मते मिळालेली आहेत. राष्ट्रवादीचे डोमानसियो बारेटो यांना ३२ तृणमूलच्या राखी नाईक यांनाही ३२ तर अपचे अभिजित देसाई यांना ६८ मते मिळालेली आहेत

गोव्यात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. पणजीत भाजपचे उमेदवार बाबूश मोन्सेरात यांनी आघाडी घेतली तर साखळीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पिछाडीवर आहेत. साखळीत काँग्रेस उमेदवाराने आघाडी घेतली आहे. प्राथमिक कलानुसार प्रमोद सावंत ४३६ मतांनी पिछाडीवर आहेत. तर वाळपईत विश्वजित राणे यांनी २२७३ मतांची आघाडी घेतली आहे. ताळगावात जेनिफर मोन्सेरात यांनी आघाडी घेतली आहे. हळदोण्यात पहिल्या फेरीत भाजपचे ग्लेन टिकलो आघाडीवर आहेत.पर्येत दिव्या राणे, फातोर्डामध्ये विजय सरदेसाई, शिवोलीत दयानंद मांर्देकर, म्हापशात जोशुआ डिसोझा, पर्वरीतून रोहन खंवटे यांनी आघाडी घेतली आहे.

logo
Pudhari News
pudhari.news