गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत पिछाडीवरून आघाडीवर | पुढारी

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत पिछाडीवरून आघाडीवर

पणजी; पुढारी ऑनलाईन

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या साखळी विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुन्हा आघाडीवर आले आहेत. प्रमोद सावंत यांनी ७,१८३ मतांची आघाडी घेतली आहे. तर सुरुवातीला आघाडी घेतलेले काँग्रेस उमेदवार धर्मेश सगलानी ६,५९८ मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर गेले आहेत.

गोव्यात प्राथमिक कलानुसार भाजप १८ जागांवर तर त्या खालोखाल काँग्रेस १२ जागांवर आघाडीवर आहे. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष ५ जागांवर आघाडीवर आहे. गोवा फॉरवर्ड, आप प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर आहेत. अपक्षांनी ३ जागांवर आघाडी घेतली आहे.

गोव्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये उत्तर गोव्यात विश्वजित राणे व त्यांच्या पत्नी डॉ. दिव्या राणे सध्या सर्वांधिक मतांनी आघाडीवर आहेत. पर्येमधून दिव्या राणे ८६९८ मतांनी आघाडीवर आहेत. तर वाळपईमधून ५८७४ मतांनी आघाडीवर आहेत.

कुडतरीमधून आलेक्स रेजिनाल्ड व कुठ्ठाळीतून आंतानिओ वाझ हे अपक्ष उमेदवार सध्या आघाडीवर आहेत. बाणावलीमध्ये विन्सी व्हीएगस हे आपचे उमेदवार आघाडीवर आहेत. दक्षिणेत मडगावमधील काँग्रेसचे उमेदवार दिगंबर कामत सर्वाधिक ५८४९ मतांनी आधाडीवर आहेत. लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या मांद्रे मतदारसंघात जीत आरोलकर आघाडीवर आहेत. त्यांच्या पाठोपाठ दयानंद सोपटे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. सकाळी पोस्टल मतदानात आघाडीवर असणारे उत्पल पर्रीकर ईव्हीएम मोजणीमध्ये ७०४ मतांनी सध्या पिछाडीवर आहेत. पणजीत बाबूश मोन्सेरात सध्या आघाडीवर आहेत.

Back to top button