गोवा विधानसभा निवडणूक : मतदारांमध्ये उत्सुकता ; गतवेळीच्या आकडेवारीवरून तर्कवितर्क सुरू | पुढारी

गोवा विधानसभा निवडणूक : मतदारांमध्ये उत्सुकता ; गतवेळीच्या आकडेवारीवरून तर्कवितर्क सुरू

पणजी : पुढारी वृत्तसेवा

विधानसभा निवडणुकीसाठी (गोवा विधानसभा निवडणूक) सोमवारी (दि. 11 रोजी) 78.94 टक्के मतदान झाले. यापूर्वी 2017 आणि 2012 च्या विधानसभेसाठी झालेले मतदान पाहता यंदा मतदानात 3.62 टक्के घट झाली आहे. टक्केवारीचे हे गणित कोणत्या उमेदवाराच्या अंगलट येणार आणि कोणाला त्याचा फायदा होणार याबाबत मतदारांमध्ये उत्सुकता आहे. सन 2017 च्या निवडणुकीत 82.56 टक्के मतदान झाले होते तर 2012 च्या विधानसभा निवडणुकीत (गोवा विधानसभा निवडणूक) ही टक्केवारी 82. 94 टक्के होती. यंदा दुपारी 1 पर्यंत 44.53 टक्के मतदान झाले होते.

सकाळच्या सत्रात मतदारांचा प्रतिसाद पाहता दिवसभरातील मतदान 80 टक्क्यांच्या पुढे जाईल, अशी शक्यता होती. मात्र, तसे झाले नाही. सन 2017 च्या निवडणुकीत (गोवा विधानसभा निवडणूक) भाजपला 32.5 टक्के मते मिळाली होती. तरी त्यांचे 13 आमदार निवडून आले होते. काँग्रेसला 28.4 टक्के मते मिळूनही त्यांचे 17 आमदार निवडून आले होते. त्यामुळे जास्त मते मिळवूनही भाजप दुसर्‍या क्रमांकावर राहिला होता.

सन 2017 च्या निवडणुकीत विजयी उमेदवार, पहिल्या तीन क्रमांकांची मते प्राप्त केलेले उमेदवार आणि त्यांचे पक्ष, मतदारसंघासह पुढीलप्रमाणे :

उत्तर गोवा

मांद्रे : दयानंद सोपटे (काँग्रेस) 16,490 विजयी विरूद्ध लक्ष्मीकांत पार्सेकर (भाजप)
9,371, श्रीधर मांजरेकर (मगो) 678.
पेडणे : बाबू आजगावकर (मगो) 15,745 विजयी विरूद्ध राजेंद्र आर्लेकर (भाजप) 9,715. विकेस असोटिकर काँग्रेस 1,013.
डिचोली : राजेश पाटणेकर (भाजप) 10,654 विजयी विरुद्ध नरेश सावळ (मगो) 9,988, अ‍ॅड. मनोहर शिरोडकर (काँग्रेस) 1,761.
थिवी : नीळकंठ हळर्णकर (काँग्रेस ) 11099 विजयी विरूद्ध किरण कांदोळकर (भाजप) 10304, प्रदीप घाडी आमोणकर (आम आदमी पक्ष) 703.
म्हापसा : फ्रान्सिस डिसोजा (भाजप) 10957 विजयी विरूद्ध विनोद फडके (मगो) 4129, विजय भिके (काँग्रेस) 3013.
शिवोली : विनोद पालयेकर (गोवा फॉरवर्ड) 10189 विजयी विरूद्ध दयानंद मांद्रेकर (भाजप) 8748, विष्णू नाईक (आप) 1854.
साळगाव : जयेश साळगावकर (गोवा फॉरवर्ड) 9735 विजयी विरूद्ध दिलीप परुळेकर (भाजप) 7598, अग्नेलो फर्नांडिस (काँग्रेस) 1616
पर्वरी : रोहन खंवटे (अपक्ष) 11174 विजयी विरूद्ध गुरुप्रसाद पावसकर (भाजप) 6961, राजेश कवळेकर (आप) 846.
हळदोणा : ग्लेन टिकलो (भाजप) 9405 विजयी विरूद्ध अमरनाथ पणजीकर (काँग्रेस) 4949, रोजी डिसोजा (आप) 3205.
पणजी : सिद्धार्थ कुंकळ्येकर (भाजप) 7954 विजयी विरूद्ध बाबूश मोन्सेरात (युनायटेड गोवन्स पक्ष) 6855, वाल्मिकी नाईक (आप) 1944.
ताळगाव : जेनिफर मोन्सेरात (काँग्रेस) 11534 विजयी विरूद्ध दत्तप्रसाद नाईक (भाजप) 8679, सेसील रॉड्रिग्स (आप) 1976.
सांताक्रुझ : टोनी फर्नांडिस (काँग्रेस) 6202 विजयी विरूद्ध हेमंत गोलतकर (भाजप) 5560, रुडाल्फ फर्नांडिस (अपक्ष) 5262.
सांत आंद्रे : फ्रान्सिस्को सिल्वेरा (काँग्रेस) 8087 विजयी विरूद्ध रामराव वाघ (भाजप) 3017, जगदीश भोबे (मगो) 2393.
कुंभारजुवे : पांडुरंग मडकईकर (भाजप) 12395 विजयी विरूद्ध झेवियर फियालो (काँग्रेस) 3961, प्रकाश नाईक (आप) 2394.
मये : प्रवीण झाट्ये (भाजप) 12430 विजयी विरूद्ध संतोष सावंत (काँग्रेस ) 7456, आत्माराम गावकर (गोवा सुरक्षा मंच) 2317.
साखळी : डॉ. प्रमोद सावंत (भाजप) 10058 विजयी विरूद्ध धर्मेश सगलानी (काँग्रेस) 7927, डॉ. सुरेश आमोणकर (गोवा सुरक्षा मंच) 3831
पर्ये : प्रतापसिंग राणे (काँग्रेस) 14977 विजयी विरूद्ध विश्वजीत कृष्णराव राणे (भाजप) 10911, सुहास नाईस (मगो) 469.
वाळपई : विश्‍वजित राणे (काँग्रेस) 13493 विजयी विरूद्ध सत्यविजय नाईक (भाजप) 7815, विजय गावकर (मगो)3246.
कळंगुट : मायकल लोबो (भाजप) 11136 विजयी विरूद्ध आलेक्स सिक्वेरा (काँग्रेस) 7311, गोडवीन फर्नांडिस (आप) 1465.

दक्षिण गोवा

फोंडा : रवी नाईक (काँग्रेस) 9502 विजयी विरूद्ध सुनिल देसाई (भाजप) 6492, राजेश वेरेकर (अपक्ष), 5529, लवू मामलेदार (मगो) 3796.
शिरोडा : सुभाष शिरोडकर (काँग्रेस) 11156 विजयी विरूद्ध महादेव नाईक (भाजप) 6286, अभय प्रभू (मगो) 5815.
मडकई : सुदिन ढवळीकर (मगो) 17093 विजयी विरूद्ध प्रदीप शेठ (भाजप) 3413, उर्मिला नाईक (काँग्रेस) 1259.
मुरगाव : मिलिंद नाईक (भाजप) 8466 विजयी विरूद्ध संकल्प आमोणकर (काँग्रेस) 8326, कार्ल वाझ (आप) 267.
वास्को : कार्लुसअल्मेदा (भाजप) 8765 विजयी विरूद्ध दाजी साळकर (अपक्ष) 7114, जुझे फिलिप डिसोझा (राष्ट्रवादी काँग्रेस), 4202, सैफुल्ला खान (काँग्रेस) 3737.
दाबोळी : माविन गुदिन्हो (भाजप) 7234 विजयी विरूद्ध प्रेमानंद नानोसकर (मगो) 4740, फ्रान्सिस्को नुनीस (काँग्रेस) 2752.
कुठ्ठाळी : एलिना साल्ढाणा (भाजप) 5666 विजयी विरूद्ध अंतोनीयो वाझ (अपक्ष) 5148, गिल्बर्ट (काँग्रेस) 4326
नुवे : विल्फ्रेड डिसा (काँग्रेस) 9967 विजयी विरूद्ध मीकी पाशेको (गोवा सुराज पक्ष) 4307, मारियानो गुदिन्हो ( आप) 3389.
कुडतरी : आलेक्स रेजिनाल्ड (काँग्रेस) 12105 विजयी विरूद्ध आर्थुर डीसिल्वा (भाजप) 5144,एडविन वाझ (आप) 2711.
फातोर्डा : विजय सरदेसाई (गोवा फॉरवर्ड) 10516 विजयी विरूद्ध दामू नाईक (भाजप ) 9182, रंजीत कारवालो (आप) 1479.
मडगाव : दिगंबर कामत (काँग्रेस) 12105 विजयी विरूद्ध शर्मद रायतूरकर (भाजप) 7929, संतोष रायतूरकर (आप) 1832.
बाणावली : चर्चिल आलेमाव (राष्ट्रवादी काँग्रेस) 9373 विजयी विरूद्ध रॉयला फर्नांडिस (आप) 64182, कायतान सिल्व्हा (अपक्ष) 3995, डवीन बारेटो (काँग्रेस) 2157.
नावेली : लुईझीन फालेरो (काँग्रेस) 8183 विजयी विरूद्ध आवर्तेन फुर्तादो (अपक्ष) 5705, डवीन सीप्रू कारदोस ( अपक्ष ) 3027
कुंकळ्ळी : क्लाफासीयो डायस (काँग्रेस) 6415 विजयी विरूद्ध ज्योकीम आलेगाव (अपक्ष) 6382, राजन नाईक (भाजप) 5047, एल्वीस गोम्स (आप) 3437.
वेळ्ळी : फिलीप नेरी रॉड्रिग्स (काँग्रेस) 6470 विजयी विरूद्ध बेंजामिन सिल्वा (अपक्ष) 5164, क्रुझ सिल्वा (आप) 3423.
केपे : बाबू कवळेकर (काँग्रेस) 13525 विजयी विरूद्ध प्रकाश वेळीप (भाजप) 10933, जो फर्नांडिस (आप) 2385.
कुडचडे : निलेश काब्राल (भाजप) 12830 विजयी विरूद्ध श्याम सातार्डेकर (गोवा सुरक्षा मंच) 3742, रुझारीयो फर्नांडिस (काँग्रेस) 2778.
सावर्डे : दीपक प्रभू पाऊसकर (मगो) 14575, विजयी विरूद्ध गणेश गावकर (भाजप) 9354, शंकर किर्लपाळकर (काँग्रेस) 991.
सांगे : प्रसाद गावकर (अपक्ष) 7636 विजयी विरूद्ध सुभाष फळदेसाई (भाजप) 6699 , सावित्री कवळेकर (काँग्रेस) 5736.
काणकोण : इजीदोर फर्नांडिस (काँग्रेस) 10853 विजयी विरूद्ध विजय पै खोत (भाजप) 8745, रमेश तवडकर (अपक्ष )7739.
प्रियोळ : गोविंद गावडे (अपक्ष) 15149 विजयी विरूद्ध दीपक ढवळीकर (मगो) 10463, डॉ. दत्ताराम देसाई (आप ) 456.

Back to top button