गोवा निवडणूक : अन् आपच्या उमेदवार भावनावश होऊन ओक्साबोक्शी रडल्या | पुढारी

गोवा निवडणूक : अन् आपच्या उमेदवार भावनावश होऊन ओक्साबोक्शी रडल्या

पणजी : पुढारी वृत्तसेवा:  माझ्या चारित्र्यावर आक्षेपार्ह टीका करणार्‍या आवेर्तान फुर्तादो यांना नावेलीतील मतदार आणि विशेषतः महिला धडा शिकवतील, अशी आशा आम आदमी पक्षाच्या नावेली उमेदवार प्रतिमा कुतिन्हो यांनी व्यक्त केली. पणजी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आवेर्तान यांना गलिच्छ राजकारण खेळणे थांबवावे, असा सल्लाही दिला. यावेळी भावनावश होऊन त्या ओक्साबोक्शी रडल्या. आवेर्तान यांच्याकडे माझ्याविरुद्ध बोलण्यासाठी काहीही नसल्यानेच त्यांनी माझ्या चारित्र्यावर आरोप केले.

नावेलीच्या विकासाची दृष्टी नाही म्हणून ते स्त्रीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविण्याचे घाणेरडे राजकारण करत आहेत. ते मला एक महिला म्हणून सन्मान देत नाही तर नावेलीतील महिलांना काय मान देणार ? त्यांना निवडून येण्याचा काहीही अधिकार नाही, असा दावा कुतिन्हो त्यांनी केला. गेल्या निवडणुकीत ते अपक्ष उमेदवार होते, परंतु नंतर भाजपमध्ये सामील झाले. महिलांबाबत घाणेरडे वक्तव्य करून त्यांनी दाखवून दिले आहे की ते खरोखरच भाजपच्या मुशीतील आहेत. यावेळी आतिशी म्हणाल्या की, जेव्हा प्रतिमा सारखी खंबीर स्त्री लोकांच्या हक्कांसाठी उभी राहते, गरज असते तेव्हा लोकांपर्यंत पोहोचते तेव्हा असे राजकारणी हीन पातळी गाठतात. (गोवा निवडणूक)

काँग्रेस उमेदवाराने आमच्या महिला उमेदवारावर केलेल्या हीन व्यक्तव्याचा मी निषेध करतो. सार्वजनिक आयुष्यात सभ्यपणे वागणे आवश्यक आहे.

– अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री, दिल्ली

हेही वाचलतं का?

Back to top button