म्हापसा ः पुढारी वृत्तसेवा आगामी विधानसभा निवडणूकीत म्हापशाच्या विकासाठी काम करू शकेल, असा उमेदवार निवडून द्या, असे आवाहन तृणमूल काँग्रेसचे म्हापशाचे उमेदवार अॅड. तारक आरोलकर यांनी केले. येथे मगोप पदाधिकर्यांसमवेत संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मगोप म्हापसा गट अध्यक्ष गीतेश डांगी, उपाध्यक्ष कृष्णनाथ दिवकर, केंद्रीय समिती सदस्य श्रीपाद येंडे, फ्रान्सिस लोबो, महेश नाईक, उमेश नाईक आदी उपस्थित होते. (गोवा निवडणूक)
नवीन बसस्थानक हा राज्यात चर्चेचा विषय बनला आहे. बसस्थानक पूर्णपणे कार्यरत नसल्याने जनतेला मूर्ख बनवणे सोपे असल्याची चर्चा राज्यात सुरू आहे, अशी टीका अॅड. आरोलकर यांनी केली. काँग्रेस उमेदवाराचा एक पाय आधीच भाजपामध्ये आहे. माजी मंत्री मायकल लोबो ज्यांना काँग्रेसचे तिकिट मिळाले आहे, ते नंतर काँग्रेस आमदारांना भाजपमध्ये घेऊन जाण्यास आले आहेत. कळंगुटमध्ये ते भाजपच्या तिकिटावर विजयी होणार नाहीत, याची खात्री पटल्यानेच लोबो यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचा दावा अॅड. आरोलकर यांनी केला.गेल्या सहा दिवसांत म्हापसा येथील सुमारे 775 लोक हे आमच्या पक्षाशी जोडले गेलेत, असे अॅड. आरोलकर यांनी सांगितले. (गोवा निवडणूक)
हेही वाचलत का?