पणजी : भरधाव कारची दुचाकीला धडक; दाम्‍पत्‍य जागीच ठार - पुढारी

पणजी : भरधाव कारची दुचाकीला धडक; दाम्‍पत्‍य जागीच ठार

मडगाव ; पुढारी वृत्तसेवा

भरधाव कारने चिरडून दोन पोलीस कॉन्स्टेबलवर मृत्यू ओढविल्याच्या घटनेला २४ तास हाेण्‍यापूर्वीच मायणा कुडतरी गांधी रोडवर एका भरधाव कारच्‍या धडकेत दाम्पत्य जागीच ठार झाले. कॅंनडी डीकोस्ता (वय ३५) आणि व्हेला डीकोस्ता (२८) असे त्‍याचे नाव आहे. रविवार रात्री ही दुर्घटना घडली. मायणा कुडतरी पोलिसांनी या प्रकरणी कार चालकाला अटक केली आहे.

रविवारी रात्री एक वाजण्याच्या दरम्यान गांधी रोडवर ही घटना घडली. यावेळी भरधाव वेगाने मागून आलेल्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. सुमारे ३०० मीटर पर्यंत दुचाकी फरफटत नेली. या अपघातात दुचाकीस्‍वार  कॅंनडी डीकोस्ता (वय ३५) आणि त्यांची पत्नी नोव्हेला डीकोस्ता (२८) जागीच ठार झाले. या प्रकरणी कार चालक नाथानेलं मास्करन्हेस (२३) याला अटक करण्यात आली आहे. या अपघातात वाहनांचा चुराडा झाला.

हेही वाचलं का? 

Back to top button