Gautami Patil Dance : ‘सुटला माझा पदर, नव्हते भानात…’ गौतमीची ‘ती’ अदा पडली भारी; सुरक्षरक्षक धावले मदतीला

Gautami Patil Dance : ‘सुटला माझा पदर, नव्हते भानात…’ गौतमीची ‘ती’ अदा पडली भारी; सुरक्षरक्षक धावले मदतीला
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असणाऱ्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमादरम्यान एक मोठी दुर्घटना घडली. सांगलीच्या पलूस येथे सुरु असलेल्या एका कार्यक्रमादरम्यान गौतमी पाटील स्टेजवरुन खाली पडली. या दुर्घटनंतर क्षणार्धात उपस्थित काही तरुण स्टेजच्या दिशेने धावले. कार्यक्रम सुरु असतानाच झालेल्या या दुर्घटनेची बातमी वेगाने पसरली आहे. मात्र गौतमी खाली कोसळल्यानंतर जे घडलं त्यावर सोशल मीडियावर चर्चा रंगलेल्या आहेत. (Gautami Patil Dance)

सांगलीच्या पलूस येथे दहीहंडीनिमित्त गौतमी पाटील हीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. कार्यक्रमाला नेहमीप्रमाणे प्रचंड गर्दी होती. गौतमी स्टेजवर बेभान होऊन नाचत होती. ट्रेंडिंगवरील गाण्यांवरील तिचा नाच पाहून प्रेक्षक देखील तिच्या कलेला दाद देत होते. मात्र याचदरम्यान गौतमीचा नाचत असताना पाय घसरला आणि ती जोरात कोसळली. नाचत असताना ती खाली पडल्याने कित्येकांना तिच्या नृत्याचाच भाग असल्याचे क्षणभर वाटले. मात्र गौतमीने जेव्हा पायाला हात लावत वर पाहिलं तेव्हा तिच्या मदतीसाठी सुरक्षारक्षक धावले. सुरक्षारक्षकांनी तिला हात धरुन उचलले.

दहीहंडीनिमित्त सुरु असलेल्या कार्यक्रमामध्ये गौतमीच्या शो साठी वेगळा स्टेज होता. तिच्या स्टेजच्या बाजूलाच मान्यवरांचे आणखी एक स्टेज होते. या स्टेजवरुन देखील कित्येकजण उभे राहून गौतमीचे नृत्य पाहण्यात गुंग होते. गौतमीच्या चाहतावर्गामध्ये तिचे नृत्य पाहण्यासाठी मिळेल तिथे जागा पकडण्याची धडपड सुरु होती. याच दरम्यान ट्रेंडिंगवरील एक गाणं लागलं अणि तरुणाईसह सर्वांच्या भुवया उंचावल्या. याचदरम्यान गौतमीचा पाय घसरला आणि ती खाली पडली. विशेष म्हणजे ती खाली पडल्यानंतर उभी राहिली आणि पुन्हा नृत्याला सुरुवात केली. त्यानंतर पुन्हा चाहत्यावर्गामध्ये जल्लोषाचे वातावरण सुरु झाले.

'या' गाण्यावर गौतमीचे नृत्य

'माझा कारभार सोपा नसतोय रं' हे गौतमीचं प्रसिद्ध काही दिवसांपासून ट्रेंडिंगवर आहे. सांगलीच्या पलूस येथे सुरु असलेल्या कार्यक्रमात गौतमीने अनेक गाण्यांवर नृत्य सादर केले. 'म्हा बघून तोल माझा गेला' हे गाणं सध्या डीजेवर प्रसिद्ध आहे. गौतमीने अनेकदी या गाण्यावर नृत्य सादर केलेले आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news