

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मुंबईची मुख्य ओळख असलेल्या गेट वे ऑफ इंडियाचे बांधकाम ३१ मार्च १९९३ ला सुरू झाले आणि १९२४ मध्ये पूर्ण झाले. ब्रिटिश राजे पंचम जॉर्ज आणि महाराणी मेरीच्या स्वागतासाठी ही वास्तू उभारण्यात आली. भारताचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वास्तूचे उद्घाटन ४ डिसेंबर १९२४ रोजी झाले. याचा अर्थ पुढील वर्षी गेट वे आपला शतकोत्सव साजरा करील. त्याआधी तरी या तब्बल ८५ फूट उंच भव्यदिव्य आणि देखण्या वास्तूचा जीर्णोद्धार व्हावा, अशी अपेक्षा मुंबईकर करत आहेत.'( Gateway of India)
आपल्या उभारणीचे शतक साजरे करणाऱ्या गेट वे ऑफ इंडियाच्या ऐतिहासिक वास्तूला तडे गेल्याचा धक्कादायक अहवाल महाराष्ट्राच्या पुरातत्त्व विभागाने दिला आहे. राज्य पुरातत्व खात्याच्या या अहवालानुसार गेट वे ऑफ इंडियाच्या पाया आणि भिंतींना प्रचंड मोठ्या भेगा पडल्या आहेत आणि ही वास्तू ठिकठिकाणी कमकूवत होत चालली आहे. या वास्तूची वेळीच डागडुजी केली नाही तर अघटित घडू शकते, असा इशाराच एक प्रकारे या अहवालाने दिला असून, गेट वेची तातडीने दुरुस्ती हाती घेण्याची शिफारस राज्य सरकारला केली आहे.
समाविष्ठ असली तरी त्याची देखभालीची जबाबदारी महाराष्ट्र सरकारकडे आहे. मध्यंतरी गेट वेच्या देखभालीसाठी आठ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार असल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली होती. लवकरच हा प्रस्ताव मंजूर होवून जीर्ण होत चाललेल्या गेटवेचा जीर्णोद्धार केला जाईल, असेही ते म्हणाले होते. मात्र, पुढे काही झाले नाही. आता पुरातत्व खात्यानेच धोक्याचा इशारा देणारा अहवाल दिला. गेट वे ऑफ इंडिया समुद्रकिनारी असल्याने त्यावर आणि खासकरून त्याच्या पायावर सतत भरतीच्या लाटा आदळत असतात. काही वर्षांपूर्वी या लाटांच्या तडाख्यामुळेच गेट वेची एक संरक्षक भिंत तुटली होती. तेव्हाच ही वास्तू धोक्यात आल्याचे संकेत मिळाले होते.
हेही वाचा