Kolhapur Ganpati Visarjan 2026: महाद्वार रोडबाबत कोल्हापूर पोलिसांचा मोठा निर्णय, विसर्जनासाठी काय इशारा?

Kolhapur Latest News: साऊंड सिस्टीमची ट्रायल घेतली तरी सिस्टीम जागेवरच जप्त होणार; पोलिसांचा थेट इशारा
Kolhapur Ganpati Visarjan 2026: महाद्वार रोडबाबत कोल्हापूर पोलिसांचा मोठा निर्णय, विसर्जनासाठी काय इशारा?
Published on
Updated on

Kolhapur Ganpati Visarjan 2026

कोल्हापूर : यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर कोल्हापूर पोलिसांकडून थेट आणि अत्यंत कठोर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. मिरवणूक अत्यंत शिस्तबद्ध, शांततेत आणि वेळेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने यंदा चोख नियोजन आखले आहे. या पार्श्वभूमीवर करवीर उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) प्रिया पाटील यांनी गणेशोत्सव मंडळांना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

Kolhapur Ganpati Visarjan 2026: महाद्वार रोडबाबत कोल्हापूर पोलिसांचा मोठा निर्णय, विसर्जनासाठी काय इशारा?
Kolhapur Keshavrao Bhosale Natyagruh reopening | केशवराव भोसले नाट्यगृह एक ऑक्टोबरपासून सुरू

दरवर्षी विसर्जन मिरवणुकीदरम्यान मुख्य मार्गांवर होणारी प्रचंड गर्दी आणि मंडळांचा रेंगाळणारा मुक्काम यामुळे मिरवणुकीला विलंब होतो. हा खोळंबा टाळण्यासाठी संपूर्ण मिरवणूक मार्गावर सात महत्त्वाच्या ठिकाणी 'सिग्नल व्यवस्था' कार्यान्वित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या सिग्नल यंत्रणेच्या माध्यमातून मिरवणुकीचा वेग आणि अंतर नियंत्रित ठेवले जाणार असून, वाहनांचा आणि मिरवणुकीचा मार्ग सतत प्रवाही ठेवण्याचा पोलिसांचा प्रयत्न राहील.

महाद्वार रोडवर २० मिनिटेच थांबता येणार

मिरवणुकीचा मुख्य आणि अत्यंत संवेदनशील टप्पा मानल्या जाणाऱ्या महाद्वार रोडवर मंडळांच्या वेळेवर विशेष निर्बंध लादण्यात आले आहेत. महाद्वार रोडवर कोणत्याही एका मंडळाला एका जागेवर केवळ २० मिनिटेच थांबता येणार आहे. निर्धारित वेळेपेक्षा जास्त काळ मंडळे एकाच जागी थांबल्यास त्यांच्यावर प्रशासनाकडून तत्काळ कारवाई केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. वेळेचे हे काटेकोर नियोजन मिरवणूक वेळेत पुढे नेण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.

सर्व नियमांचे पालन साऊंड सिस्टीम चालक, मंडळांना बंधनकारक

ध्वनीप्रदूषणाच्या मुद्द्यावरही पोलिसांनी यंदा अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. मिरवणुकीदरम्यान मंडळांनी डॉल्बीच्या आवाजाची विहित मर्यादा ओलांडल्यास त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची गय न करता गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. सर्वोच्च न्यायालय आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन साऊंड सिस्टीम चालकांना आणि गणेश मंडळांना बंधनकारक असणार आहे.

Kolhapur Ganpati Visarjan 2026: महाद्वार रोडबाबत कोल्हापूर पोलिसांचा मोठा निर्णय, विसर्जनासाठी काय इशारा?
Kolhapur Crime : आसुर्ले येथे महाप्रसादाच्या वादातून तरुणावर दगडी फरशीने हल्ला, पन्हाळा पोलिसांत गुन्हा दाखल

विशेषतः विसर्जन मिरवणुकीच्या आदल्या दिवशी रात्री किंवा पहाटेच्या सुमारास अनेक मंडळांकडून साऊंड सिस्टीमच्या आवाजाची 'ट्रायल' घेतली जाते, ज्यामुळे नागरिकांना नाहक त्रास होतो. यंदा अशा चाचण्यांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. मिरवणुकीच्या पूर्वसंध्येला अथवा पहाटे शहरात कुठेही साऊंड सिस्टीमच्या आवाजाची ट्रायल घेतल्याचे निदर्शनास येताच, पोलीस तत्काळ घटनास्थळी जाऊन साऊंड सिस्टीम जप्त करतील आणि संबंधितांवर थेट कायदेशीर गुन्हे नोंदवतील, असा सज्जड इशारा डीवायएसपी प्रिया पाटील यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news