Dombivli Ganeshotsav : यापुढे एकाच मूर्तीची स्थापना; विसर्जन बंद

डोंबिवलीत ५० वर्षांची परंपरा बदलली; श्रीखंडे वाडीतील ऐतिहासिक निर्णय
Dombivli Ganeshotsav
Dombivli Ganeshotsavpudhari photo
Published on: 
Updated on: 

डोंबिवली : गणेशोत्सव म्हटला की विसर्जन मिरवणूक आलीच, पण डोंबिवलीतील एका मंडळाने यंदा ५० व्या वर्षांत पर्यावरणपूरक आणि भक्तीचा नवा आदर्श घालून दिला आहे. १९७७ साली स्थापन झालेल्या श्रीखंडे वाडीतील तरुण मित्र मंडळाने यावर्षीपासून मोठ्या गणेशमूर्तीचे विसर्जन न करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे.

यंदाचे या मंडळाचे सुवर्णमहोत्सवी ५० वे वर्ष आहे. या निमित्ताने मंडळाने फायबरची अतिशय सुंदर आणि आकर्षक अशी कायमस्वरूपी गणेश मूर्ती विकत घेतली आहे. यापुढे दरवर्षी याच मूर्तीची स्थापना केली जाणार असून मोठ्या मूर्तीचे विसर्जन केले जाणार नाही. असे पाऊल उचलणारे हे डोंबिव-लीतील एकमेव मंडळ ठरले आहे.

Dombivli Ganeshotsav
Bhiwandi Garbage Free City : भिवंडी शहर विद्रूप करणाऱ्या कचरा कुंड्या बंद

केवळ पूजेसाठी आणलेली छोटी गणेशाची मूर्ती ते मंडपातच ड्रममधील स्वच्छ पाण्यात विसर्जित करणार आहेत. मंडळाकडे स्वतःची मोठी जागा नसल्याने ही भव्य कायमस्वरूपी मूर्ती जवळच असलेल्या एका मंगल कार्यालयाच्या हॉलमध्ये सुरक्षित ठेवण्यात येणार आहे. या मंडळाची विसर्जन मिरवणूक म्हणजे डोंबिवलीकरांसाठी एक पर्वणीच असते.

दरवर्षी विविध देखावे, भव्य चित्ररथ, प्रबोधनात्मक पथनाट्य, लेझीम आणि ढोल पथकाच्या गजरात निघणारी ही मिरवणूक डोंबिवलीच्या प्रमुख रस्त्यांवरून फिरते. ही देखणी मिरवणूक पाहण्यासाठी हजारो डोंबिवलीकर आवर्जून गर्दी करतात.

Dombivli Ganeshotsav
Thane Crime : २१ दुचाकी चोरणाऱ्या दोघांना बेड्या

यंदाही तीच परंपरा कायम राहणार आहे. फरक इतकाच की, मिरवणुकीत हीच कायमस्वरूपी भव्य मूर्ती विविध देखाव्यांसह मिरवली जाणार आहे. शेवटी मंडपात परत आणली जाणार आहे. तर छोट्या पूजेच्या मूर्तीचे पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करून मंडळाने इतर मंडळांसमोर एक नवा आदर्श ठेवला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news