Bhiwandi Garbage Free City : भिवंडी शहर विद्रूप करणाऱ्या कचरा कुंड्या बंद

दुर्गंधीपासून सुटका झाल्याने नागरिकांमध्ये समाधान; रस्त्यावर कचरा न टाकण्याचे आवाहन
Bhiwandi Garbage Free City
Bhiwandi Garbage Free Citypudhari photo
Published on: 
Updated on: 

भिवंडी : भिवंडी शहरात रस्त्यालगत उड्डाणपुलाखाली कचरा टाकला जात असल्याने शहराचे विद्रुपीकरण व दुर्गंधीने नागरिक हैराण असल्याने यावर पालिका आयुक्त अनमोल सागर यांनी कचरा कुंडी मुक्त शहर करण्यासाठी प्रयोग हाती घेतला आहे. ज्यामध्ये प्रातिनिधिक स्वरूपात पाच-बोरभाग समितीमध्ये मुख्य रस्त्यावरील कचरा कुंडी बंद केल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनीसुद्धा दुर्गंधीपासून सुटका झाल्याने समाधान व्यक्त केले आहे.

पालिका क्षेत्रात अनेक रस्त्यांवर कचरा टाकला जात असल्याने त्या परिसरातून जाताना नागरिकांना नाक मुठीत धरून जावे लागत आहे. तर असा रस्त्यालगत कचरा साठल्याने शहराचे विद्रुपीकरण सुद्धा मोठ्या प्रमाणावर होत आहे. यावर आयुक्त अनमोल सागर यांनी सार्वजनिक आरोग्य विभागास कचरा कुंडी मुक्त शहर बनविण्यासाठी सूचना दिल्यानंतर उपायुक्त विक्रम दराडे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य विभाग प्रमुख फैसल तातली, जे. एम. सोनवणी, हरेश भंडारी यांनी प्रभाग समिती निहाय एक अशा पाच कचरा कुंडी कायमस्वरूपी बंद करण्यासाठी पाऊल उचलले.

Bhiwandi Garbage Free City
Thane Rice Crop : भातपिकाचा हंगाम लांबला; दाणे भरण्यासाठी पावसाची प्रतीक्षा

ज्यामध्ये प्रभाग समिती क्र. एक मधील वार्ड क्रमांक ३ येथील दक्षता बार, प्रभाग समिती क्र. दोन मधील वार्ड क्रमांक २१ येथील अप्सरा सिनेमा वेलकम हॉटेल, प्रभाग समिती क्र. तीन मधील वार्ड क्रमांक १५ येथील रतन सिनेमा समोरील मेट्रो पिलर, प्रभाग समिती क्र. चार मधील वार्ड क्रमांक १९ येथील सनशाईन बिल्डिंग धामणकर नाका, प्रभाग समिती क्र. पाच मधील वार्ड क्रमांक ५ येथील किर्ती बार गल्ली येथील कचरा कुंडी कायम स्वरुपी बंद केली जात आहे.

शहराच्या मुख्य रस्त्यावर वेलकम हॉटेल येथील उड्डाण पुलाखाली स्थानिक प्रभाग समिती आरोग्य निरीक्षक सुनील पाठारी, वार्ड क्रम १५ चे प्रभारी आरोग्य निरीक्षक संतोष पाटील यांनी मागील दोन दिवसात येथील कचरा पूर्ण उचलून या ठिकाणी काँक्रिट करून परिसर स्वच्छ केला आहे. हा उपक्रम राबवित असताना त्या ठिकाणी स्थानिक सफाई कर्मचारी तीन शिफ्टमध्ये चोवीस तास पहारा देत कचरा न टाकण्यासाठी आवाहन केले आहे.

Bhiwandi Garbage Free City
Thane Crime : २१ दुचाकी चोरणाऱ्या दोघांना बेड्या

कचरा घंटागाडीमध्येच टाकावा

कचरा टाकणाऱ्यांवर २०० ते १० हजार पर्यंत दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला असून. या ठिकाणांवरून आतापर्यंत ४५ हजार रुपये दंड वसूल केला असल्याची माहिती जे एम सोनवणे यांनी दिली आहे. शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याची जबाबदारी फक्त पालिका प्रशासनाची नसून नागरिकांनी सुद्धा त्यामध्ये सहकार्य करण्याची गरज आहे. आपला परिसर स्वच्छ राहिल्याने आपले आपल्या कुटुंबीयांचे व परिसराचे आरोग्य चांगले राहू शकते. त्यासाठी नागरिकांनी कचरा घंटागाडी मध्येच टाकावा असे आवाहन आयुक्त अनमोल सागर यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news