

नाशिक : पुढारी वृत्तसेवा, देव द्या, देवपण घ्या उपक्रमांत यापुर्वीचे मुर्तीदानाचे सर्व विक्रम मोडीत निघाले आहेत. या उपक्रमाला नाशिककरांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला असल्याची माहिती संयोजक आकाश पगार यांनी दिला आहे. गोदावरीला प्रदुषण वाचविण्यासाठी १३ वर्षांपूर्वी सुविचार मंच आणि विद्यार्थी कृती समितीच्या वतीने मुर्ती व निर्माल्य दान करण्यासाठीचा देव द्या, देवपण घ्या हा उपक्रम सुरु करण्यात आला होता. यानिमित्ताने आजवर प्लॅस्टर ॲाफ पॅरिसच्या लाखो मुर्तींचे दान नाशिककरांकडुन करण्यात आले आहे,. (Nashik News)
गणेश विसर्जनाच्या निमित्ताने चोपडा लाँन्सजवळील गोदापार्क येथे सकाळी ८ वाजेपासून "देव द्या देवपण घ्या" या उपक्रमाचे कार्यकर्ते मूर्ती स्विकारण्यासाठी उपस्थित होते. गणेशभक्तांना आरती करण्याची व्यवस्था देखील यावेळी उपलब्ध करुन देण्यात आली होती. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती, रासायनिक रंगकाम व इतर सौंदर्यप्रसाधने व निर्माल्यामुळे गोदावरी नदीचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते.
गणेशोत्सवातील १० दिवस सुविचार मंच व विद्यार्थी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी जनजागृती करणारे पत्रके घराघरात वाटली होती. तसेच सोशल मिडियाच्या माध्यमातून देखील प्रभावी प्रचार तसेच आवाहन करण्यात आले होते. नाशिकच्या लाखो गोदाप्रेमी भाविकांनी या आवाहनाला भरभरून पाठिंबा दिला. दिड, पाच व सात दिवसांच्या घरगुती गणेशोत्सवातील मूर्ती देखील स्वीकारण्यात आल्या होत्या.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशाल गांगुर्डे, सागर बाविस्कर, वैष्णवी जोशी, राहुल मकवाना, भाग्यश्री जाधव, जयंत सोनवणे, गौरी घाटोळ, संदिप आहिरे, संकेत निमसे, हर्षिता माळी, सोनू जाधव, गायत्री पाटील, कुणाल सानप, आदिती फड, अश्विन बोडके, आकाश सानप, प्रभाकर आढाव, पंकज देवरे, सुशिल डोंगरे, राहुल साठे, वैभव भालेराव, सौरभ वरपे, जयेश शिंदे आदींनी परिश्रम घेतले.
हेही वाचा :