गडहिंग्लज : नेसरी पोलिसांकडून आंतरराज्य टोळी जेरबंद
गडहिंग्लज : नेसरी पोलिसांकडून आंतरराज्य टोळी जेरबंद

गडहिंग्लज : नेसरी पोलिसांकडून आंतरराज्य टोळी जेरबंद

Published on

नेसरी – पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील चोरट्यांच्या आंतरराज्य टोळीला पकडण्यात नेसरी (ता. गडहिंग्लज) पोलिसांना यश आले आहे. दहा मोटरसायकली, तीन विद्युत पंप असा तब्बल ४ लाख ७९ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी महादेव रघुनाथ पाटील (वय १९, रा. सांबरे, ता. गडहिंग्लज), पांडुरंग नाईक (वय २१, रा. पोरेवाडी आमरोळी, ता. चंदगड), अजय नाईक (२५, रा. बेळगुंदी, जि. बेळगाव), रोहित लाड (वय २१) व अक्षय चौगुले (वय २६, दोघेही रा. मच्छे, जि. बेळगाव) या पाच जणांना अटक केली आहे.

या चोरट्यांनी बेळगाव, खानापूर, वडगाव, मच्छे भागातून या दुचाकी चोरल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. दरम्यान, यातील अक्षय चौगुले हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, या अनुषंगाने आणखी काही गुन्हे उघडकीस येतात का, याची पडताळणी सुरु आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news