पश्चिम बंगालमधील हुगलीत दोन गटात पुन्हा हिंसाचार, रेल्वेसेवा विस्कळीत
पुढारी ऑनलाईन डेस्क : पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यात सोमवारी रात्री उशीरा पुन्हा हिसाचारामुळे तणाव निर्माण झाला आहे. दोन गटातील संघर्षामुळे रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. दरम्यान, हुगळीत झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांनी दार्जिलिंगमधील आपला कार्यक्रम रद्द केला आहे.
रामनवमी दिवशी हुगळी जिल्ह्यात दोन गटात हिंसाचार झाला होता. यानंतर संपूर्ण जिल्ह्यात दंगल नियंत्रण दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. रिश्रा रेल्वे स्टेशनवरील क्रॉसिंगजवळ दगडफेक झाल्याने तणाव निर्माण झाला. हिंसक चकमकींमुळे सत्ताधारी तृणमूल आणि भाजप यांच्यात राजकीय संघर्ष आणखी पेटला आहे.
रेल्वे क्रॉसिंगजवळ दगडफेक
रिश्रा स्टेशनवरील रेल्वे क्रॉसिंगजवळ झालेल्या दगडफेकीमुळे हावडा-बांदेल मार्गावरील सर्व रेल्वेसेवा ३ तास बंद ठेवण्यात आली होती. हिंसाचारामुळे लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या उशिराने धावत आहे, अशी माहिती पूर्व रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी कौशिक मित्रा यांनी दिली.
हावडा येथे भाजपवर जातीय हिंसाचाराचा कट रचल्याचा आरोप करत, तृणमूलचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी एका धार्मिक मिरवणुकीचा व्हिडिओ व्हायरल केला आहे. ज्यामध्ये एक तरुण बंदूक घेऊन जाताना दिसत आहे. अभिषेक बॅनर्जी यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट करत भाजपवर निशाणा साधला आहे.
राज्यपालांचा दार्जिलिंगमधील कार्यक्रम रद्द
दरम्यान, हुगळीत झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांनी दार्जिलिंगमधील आपला कार्यक्रम रद्द केला आहे.
हेही वाचा:
- Chattisgadh News : नक्षलवाद्यांचा डाव हाणून पाडला; 5 KG जिवंत IED यशस्वीरित्या नष्ट (पाहा व्हिडिओ)
- IndiGo Flight Emergency landing : बंगळूरहून वाराणसीला जाणारे १३७ प्रवासी थोडक्यात बचावले, इंडिगोचे इमर्जन्सी लँडिंग
- CBI's diamond jubilee celebrations : 'सीबीआय सत्य आणि न्यायासाठी एक ब्रँड; कोणत्याही भ्रष्टाचाऱ्याला सोडू नका' – PM मोदी

