Rafael Nadal
Rafael Nadal

राफेल नदालचा चाहत्यांना धक्का! निवृत्तीबाबत दिले संकेत

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : 22ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकणाऱ्या स्टार टेनिसपटू राफेल नदालने गुरुवारी मोठी घोषणा करत चाहत्यांना धक्का दिला. दुखापतीमुळे यंदाची फ्रेंच ओपन स्पर्धा खेळणार नसल्याचे त्याने जाहीर केले. फ्रेंच ओपनचे 14 वेळा विजेतेपद पटकावणारा नदाल 2005 नंतर प्रथमच या स्पर्धेचा भाग असणार नाही.

राफेल नदालने पत्रकार परिषदेत खुलासा केला की, मागिल वर्षी ऑस्ट्रेलियन ओपन खेळताना मला दुखापत झाली होती. त्यातून मी अजुनही बरा झालेलो नाही. त्यामुळे मी यावेळी फ्रेंच ओपन खेळू शकणार नाही. टेनिसमधून ब्रेक घेत आहे. मी तो कधी पुनरागमन करेन याची कोणतीही तारीख निश्चित नाही. पण, पुढील वर्षी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी व्हायला आवडेल.'

तो पुढे म्हणाला, '2024 हे माझ्या व्यावसायिक कारकिर्दीचे शेवटचे वर्ष असू शकते. पण मी हे 100 टक्के म्हणू शकत नाही, कारण तुम्हाला कधीच माहिती नसते की पुढे काय होईल. हा एक निर्णय आहे जो माझे शरीर घेत आहे. पण मला एवढेच सांगायचं आहे की मी पुन्हा खेळण्यापूर्वी ब्रेक घेत आहे,' असे स्पष्ट केले.

फ्रेंच ओपन 28 मे पासून सुरू होणार

फ्रेंच ओपनची सुरुवात 28 मेपासून पॅरिसमधील रोलँड गॅरोस येथे होणार आहे. नदालने फ्रेंच ओपनमध्ये 18 वेळा भाग घेत 112 सामने जिंकले आहेत. त्याला केवळ तीन वेळा पराभव पत्करावा लागला आहे, जो कोणत्याही एका ग्रँड स्लॅममधील महिला आणि पुरुष गटातील जागतिक विक्रम आहे. नदालने गेल्या वर्षी वयाच्या ३६ व्या वर्षी पायांच्या दुखण्याशी झुंज देत ट्रॉफी जिंकली तेव्हा तो स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात वयस्कर चॅम्पियन बनला.

ऑस्ट्रेलियन ओपनमधून बाहेर पडला होता

नदाल जानेवारी 2023 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनच्या दुसऱ्या फेरीतून बाहेर पडला. मॅकेंझी मॅकडोनाल्डने त्याचा 6-4, 6-4, 7-5 असा सरळ सेटमध्ये पराभव करून तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. या सामन्यादरम्यान नदालला दुखापत झाली होती.

2003 मध्ये त्याने वयाच्या 17 व्या वर्षी विम्बल्डनमध्ये ग्रँड स्लॅम पदार्पण केले. 2005 मध्ये, नदालने त्याच्या 19 व्या वाढदिवसाच्या 2 दिवस आधी फ्रेंच ओपन जिंकले.

हे ही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news