file photo
file photo

धक्कादायक : पोलिसाच्या मुलाने पिस्तूल तोंडासमोर धरली आणि ट्रिगर दाबला…

Published on

गोवा राज्यातील डिचोली भागात ह्रदय हेलावून टाकणारा प्रकार घडला आहे. पिस्‍तुलाचा खेळ जीवावर आल्‍याचे दिसून आले. येथील वासुदेव नगर, डिचोली परिसरात एका चार वर्षाच्या बालकाने खेळता खेळता पिस्तूल तोंडासमोर धरली आणि ट्रिगर दाबला. यामध्ये चार वर्षीय मुलाचा दुर्देवाने जागीच मृत्यू झाला आहे. काल (गुरूवार) रात्री ११:३० वाजता हा प्रकार घडला.

या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की, मृत बालकाचे वडील पोलीस हेड कॉन्स्टेबल आहेत. काल रात्री त्यांनी पिस्तूल घरात आणून ठेवली होती. त्यांचे लक्ष नसताना या चार वर्षाच्या बालकाने पिस्तूल खेळायला घेतली.

खेळता खेळता त्याने ती तोंडासमोर धरली आणि ट्रिगर दाबला. कुणाला काही कळण्याआधीच त्याचा जागीच मृत्यू झाला. काल रात्री ११:३० वाजता हा प्रकार घडला आहे. दरम्यान मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हल्ली टीव्ही मालिका आणि सिनेमांमधून लहान मुलांमध्ये विविध गोष्टींचे आकर्षण निर्माण झाले आहे. टीव्हीवर दिसणाऱ्या गोष्टींचे अनुकरण करण्याचा ते प्रयत्न करत असतात. त्यामुळे पुन्हा एकदा बालकांचे पालनपोषण तसेच टीव्हीचे दुष्परिणाम यावर चर्चा सुरू झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news