

आंध्र प्रदेश : पुढारी वृत्तसेवा
आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्हा येथील मुलकालेडू या गावातील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटानंतर शेजारच्या घराची भिंत कोसळली. यामुळे घरातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले. घटनास्थळी पोलीस अधिकारी दाखल झाले असून घडलेल्या घटनेबद्दल पुढील तपास सुरू आहे (Andhra Pradesh)