Maha Shivratri 2024 | ‘या’ महाशिवरात्रीला ४ अद्भूत योगांचा संयोग; २५० वर्षांनंतर जुळून आला दुर्मिळ शुभयोग

Maha Shivratri 2024 | ‘या’ महाशिवरात्रीला ४ अद्भूत योगांचा संयोग; २५० वर्षांनंतर जुळून आला दुर्मिळ शुभयोग
Published on
Updated on

दरवर्षी १२ शिवरात्री असतात. यातील फाल्गुन महिन्याच्या चुर्तदर्शीला येणारी महाशिवरात्री असते. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता. महाशिवरात्रीचा उपवास, पूजा करणाऱ्यांच्या इच्छा-आकांक्षा महादेव पूर्ण करतात, अशी श्रद्धा आहे. देशभरातील सर्व शिवमंदिरात या दिवशी सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी झालेली असते. (Maha Shivratri 2024)

या वर्षी ८ मार्चला महाशिवरात्री आहे. ही महाशिवरात्री अतिशय विशेष आहे. या दिवशी चार अतिशय शुभयोग एकाच दिवशी येत आहेत. या शुभयोगांवर भगवान महादेवाची पूजा केल्याने ते प्रसन्न होणार होतील. नामवंत ज्योतिष चिराग दारूवाला यांनी महाशिवरात्री कधी आहे आणि दुर्मिळ योग कोणते आहेत, त्याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. Mahashivratri

ज्योतिषाचार्यांच्या मते ३ शुभयोग आणि १ शुभनक्षत्र एकाच दिवशी महाशिवरात्रीला एकत्र येण्याची ही घटना २५० वर्षांनंतर प्रथमच होत आहे. त्यामुळे या दिवशी महाशिवरात्रीचा उपवास ठेवणे आणि महादेवाची आराधना करणे अत्यंत लाभदायक ठरणार आहे.

फाल्गुन चतुर्दशीचा तिथी केव्हा आहे? Maha Shivratri 2024

फाल्गुन महिन्यातील चतुर्दशीची तिथी शुक्रवार ८ मार्चला रात्री ९.५७ मिनिटांनी सुरू होईल. ही तिथी ९ मार्चला ५ वाजून २६ मिनिटांनी संपेल. चतुर्दशच्या रात्रीचे ४ तास भगवान महादेवाची पूजा होते. म्हणजेच या दिवशी उदयतिथीला फारसा महत्त्व नाही. त्यामुळे महाशिवरात्रीचा उपवास हा ८ मार्चला असेल.

'या' दिवशी कोणते योग साकारत आहेत?

२५० वर्षांनंतर महाशिवरात्रीला ३ शुभयोग आणि एक शुभनक्षत्र एकत्र येत आहे. त्यामुळे या महाशिवरात्रीचे महत्त्व आणखीच वाढत आहे. या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, शिवयोग, अमृतसिद्ध योग आणि श्रवण नक्षत्र असणार आहे. असे योग बऱ्याच वर्षांनंतर येत असतात, त्यातून भाविकांना समृद्धीची मिळवण्याची संधी मिळत असते.

सर्वार्थ सिद्धी योग

सर्वार्थ सिद्धी योग हा महत्त्वाच्या अशा महाशिवरात्रीला असणे हा महादेवाचा आशीर्वादच आहे. सर्वार्थ सिद्धी योगावर महाशिवरात्रीचा उपवास ठेवणे आणि पूजा केल्याने प्रत्येक क्षेत्रात यश येईल आणि तुमची सर्व कामे विनाअडथळा पूर्ण होतील. भगवान महादेवाच्या आशीर्वादाने तुमची रखडलेली सर्व कामे पूर्ण होतील. विशेष म्हणजे सर्वार्थ सिद्धी योग हा शुक्रवारी येत असल्याने त्याचे महत्त्व आणखी वाढते. यामुळे या वर्षीची शिवरात्री भौतिक सुखात वाढ करणारी आहे.

शिवयोग

महाशिवरात्रीच्या दिवशीच शिवयोग आहे. हा योग ध्यानधारणा, पूजा, उपवास आदींसाठी शुभ मानला जातो. त्यामुळे या योगावर महाशिवरात्री दिवशी केलेला उपवास आणि पूजा भगवान महादेवापर्यंत लवकर पोहोचेल. तुमच्या आध्यात्मिक क्रिया पूर्ण होतील आणि तुम्हाला महादेवाचा आशीर्वाद लाभेल.

अमृत सिद्धी योग

या वर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी निशित काळावर अमृत सिद्धी योग आहे. त्यामुळे या दिवशीच्या शिवसाधनेचे संपूर्ण फल तुम्हाला मिळेल. त्यामुळे या योगावर महादेवाच्या पूजाविधी प्रभावी ठरतील आणि भोलेनाथांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. तुमचा आनंद वाढेल, आणि तुमची सर्व कामे पूर्ण होतील.

महाशिवरात्री दिवशी श्रवण नक्षत्र

महाशिवरात्रीच्या दिवशीच श्रवण नक्षत्र असल्याने हा दिवस अधिकच शुभ बनतो. श्रवण नक्षत्राचा स्वामी हा शनिदेव आहे आणि शनिदेव भगवान महादेवाचा निस्सिम भक्त आहे. त्यामुळे महाशिवरात्रीच्या उपवासा अधिकच महत्त्व आले आहे. श्रवण नक्षत्रावर शिवाची पूजा केल्याने तुम्हा या पूजेचे लाभ लवकर मिळतील.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news