1950 नंतर प्रथमच खालावले ब्रिटीश नागरिकांचे राहणीमान!

1950 नंतर प्रथमच खालावले ब्रिटीश नागरिकांचे राहणीमान!
Published on
Updated on

लंडन : एरव्ही युरोपमधील नागरिक ऐशोरामासाठी आणि आलिशान राहणीमानासाठी ओळखले जातात. पण अलीकडेच झालेल्या एका सर्वेक्षणातील निकषानुसार, ब्रिटीश लोक कधी नव्हे इतकी खाण्या-पिण्यात कंजुषी करत असून याचाच परिपाक म्हणजे 1950 नंतर प्रथमच त्यांच्या राहणीमानाचा दर्जा घसरला आहे.

ब्रिटनमध्ये 1970 पासून दोन वर्षे महागाई उच्च पातळीवर राहिली. तथापि, नोव्हेंबरमध्ये ही थोडी कमी 3.9% वर राहिली. असे असतानाही महागाईमुळे जनतेला खर्चाचा बोजा जाणवत आहे. त्याचा परिणाम आता ब्रिटिशांच्या राहणीमानावर जाणवत असल्याचा दावा यात करण्यात आला आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये जाणार्‍यांची संख्या कमी झाली आहे. बारमध्येही पूर्वीसारखी गर्दी होत नाही.

20 सिगारेटच्या पॅकची किंमत सुमारे 1537 रुपये असल्याने सिगारेटच्या जागी स्वस्त ई-सिगारेटची मागणी वाढली आहे. ई-सिगारेट फक्त 527 रु. चा आहे. ब्रँडेड वस्तूंच्या विक्रीत घट झाली आहे. स्थानिक उत्पादनांची विक्री वाढली आहे. लोक चैनीच्या खर्चात कपात करत आहेत. बाजार विश्लेषक फर्म कंटारचे म्हणणे आहे की लोक महागड्या वस्तूंऐवजी स्वस्त वस्तूंकडे वळत आहेत. 2021 आणि 2022 मध्ये किमती वाढण्याचे मुख्य कारण भोजन हे होते. स्थानिक वस्तूंची विक्री ब्रँडेड वस्तूंच्या विक्रीला मागे टाकतेय. फेब्रुवारी 2022 पासून दर महिन्याला स्थानिक वस्तूंची विक्री ब्रँडेड वस्तूंपेक्षा जास्त झाली. जास्त सवलती देणार्‍या एल्डी व लिडल या जर्मन कंपन्यांचा बाजार हिस्सा वाढला आहे. ऑक्टोबरमधील जर्मन सुपरचेन मार्केट एल्डी आणि लिडलमधील 54% खरेदीदार उच्च कमाई करणार्‍या 'एबीसी 1' सामाजिक श्रेणीतील होते.

स्वस्त वस्तूंची विक्री वाढली आहे. यामुळे सुपरमार्केट ऑपरेटिंग-प्रॉफिट मार्जिन 2022-23 मध्ये 1.8% पर्यंत कमी झाले, असा दावा यात करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news