Wound : जखम लवकर बरी होण्यासाठी…

Wound : जखम लवकर बरी होण्यासाठी…
Published on
Updated on

कितीही प्रयत्न केले तरीही जखमा, दुखापती टाळता येणे अवघड असते. खेळताना केव्हा दुखापत होईल, हे सांगता येत नसते. तसेच आपण वेगाने वाहन चालवत असतो, आपल्या वेगाकडे इतरांनी लक्ष द्यावे, अशी आपली अपेक्षा असते. यामुळेही अपघात होतात. (Wound)

अपघातातल्या जखमा आणि दुखापती लवकर बर्‍या होत नाहीत. जायबंदी अवस्थेत अनेक दिवस पडून राहिल्याने आपल्या व्यवसायाच्या कार्यावर तसेच नोकरीवर विपरित परिणाम होतो. त्यामुळे दुखापतीतून बरे होण्यासाठी एवढा वेळ देण्याची अनेक जणांची तयारी नसते. प्रत्येकाला यातून लवकर बरे होण्याची घाई असते. (Wound)

कोणतीही जखम भरून यायला किती औषधपाणी घेतले, तरी वेळ लागतोच. मात्र, तेवढा वेळ थांबण्याची तयारी अनेकांची नसते. काही वेळा किरकोळ वाटणार्‍या जखमेकडे आणि दुखापतीकडे आपण दुर्लक्ष करतो. याचा परिणाम नवी दुखापत तयार होण्यात होतो किंवा त्या दुखापतीचे परिणाम आपल्याला उर्वरित आयुष्यभर भोगावे लागतात. म्हणूनच जखमा आणि दुखापती योग्य उपचारांद्वारे लवकर बर्‍या करण्यासाठी खालील काळजी घेणे आवश्यक आहे :

1) जखम जास्त चिघळू नये यासाठी योग्य तो आहार घेणे आवश्यक असते. योग्य तो आहार न घेतल्यास जखम लवकर बरी होत नाही. शिवाय, जखमेमुळे होणार्‍या वेदनाही वाढतात. त्यामुळे अति तेलकट पदार्थ, प्रोसेसड् फूड, फास्ट फूड जखम झाल्यानंतर टाळले पाहिजे. प्रोसेसड् फूडमध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते. त्याच्यामुळे जखमेच्या वेदना वाढण्याची शक्यता असते. जखम झाल्यानंतर शरीरात पौष्टिक पदार्थ जाणे आवश्यक असते. पौष्टिक घटक शरीरात गेल्यास जखम लवकर बरी होण्यासाठी मदत होेते. दुग्धजन्य पदार्थ, साखर यासारख्या पदार्थांमुळे जखम लवकर बरी होण्यात अडचणी निर्माण होतात.

2) रसायने आणि रंग असलेले अन्नपदार्थ घेणे टाळले पाहिजे. जखम अथवा दुखापत झाली नसतानाही असे अन्न पदार्थ आहारात असू नयेत. प्रिझर्व्हेटिव्हज्, कृत्रिम गोड घटक, फ्लेवर्स यांचा वापर केलेले पदार्थ जखम आणि दुखापत झाल्यावर टाळावे.

3) फळे, भाजीपाला, नटस् यांचा समावेश आहारात करणे आवश्यक असते. जखम लवकर भरून येण्यासाठी उच्च दर्जाचे पौष्टिक पदार्थ शरीरात जाणे आवश्यक असते. पिझ्झा, बर्गर यासारख्या पदार्थांतून असे पौष्टिक पदार्थ शरीराला मिळत नाहीत. सॅलेड, बदाम, पिस्ता, सफरचंदासारखी फळे या काळात खाणे आवश्यक आहे. कच्ची फळे आणि कच्च्या भाज्या यांचा समावेश आहारात आवर्जून करावा. नारळाच्या पाण्याचाही शरीरातील पौष्टिक पदार्थांचे प्रमाण वाढविण्यासाठी उपयोग होतो.

4) मसाल्यांमध्ये जखमा लवकर बर्‍या करण्याची क्षमता असते. कांदा, लसूण, आले, मिरची यांचा वापर भाज्यांमध्ये करावा.

5) जखम झाल्यानंतर सोडा, शीतपेये, कॉफी यांचा वापर टाळावा. या काळात जितके जास्त पाणी प्याल तितके चांगले असते. शरीरात पाण्याचे प्रमाण भरपूर असेल, तर जखम लवकर बरी होण्यास मदत होते.

6) जखम आणि दुखापत बरी होण्यासाठी औषधांच्या व्यतिरिक्त अन्य उपाय करता येतात का याचा विचार करा. अ‍ॅक्युप्रेशर, मसाज यासारख्या उपायांमुळे शरीराला होणार्‍या वेदना कमी होतात. अशा उपचार पद्धती उपलब्ध करून देणारे अनेक डॉक्टर उपलब्ध असतात. या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news