Ramzan Eid Kheer : रमजान ईदसाठी खास शिरकुर्मा बनवण्याची रेसिपी | पुढारी

Ramzan Eid Kheer : रमजान ईदसाठी खास शिरकुर्मा बनवण्याची रेसिपी

पुढारी ऑनलाईन डेस्क : रमजान ईंदच्या पार्श्वभूमीवर शीरकुर्मा कसा बनवायचा, याची रेसिपी आपण पाहुया. (Ramzan Eid Kheer ) रमजान ईदची खीर सर्वांनाच ही असते. या स्पेशल रेसिपीचं नाव ऐकून तोंडाला पाणी सुटले ना! मग वाट कसली बघताय! घरच्या घरी फटाफट बनवा ईदचा स्पेशल टेस्टी शिरकुर्मा… (Ramzan Eid Kheer )

साहित्य –

काजू

बदाम

चारोळे

पिस्ता

लाल मनुके

जायफळ

अक्रोड

खीरच्या शेवया

दूध

साखर

केशर

साजूक तूप

खवा

वेलची पावडर

लाल खारीक तुकडे

काजू-बदाम cashews almonds
काजू-बदाम cashews almonds

कृती-

सर्व सुका मेव्याचे बारीक तुकडे/काप बनवून घ्यावे. (जायफळ सोडून) तुकडे खूप बारीक अथवा मोठे असू नयेत. सुका मेव्याचे तुकडे करताना तिखट तेलकट अथवा कांदा-लसणाचा हात सुक्या मेव्याला लागू नये, याची काळजी घ्या. कारण सुका मेवा दुधात मिक्स करावा लागतो, यावेळी दूध नासण्याची अथवा फुटण्याची शक्यता असते.

सुका मेव्याचे तुकडे करून बाजूला ठेवा.

आता एका स्वच्छ कढई मंद आचेवर गॅसवर तापवा. त्यामध्ये हवा तेवढा खवा आणि थोडे दूध पातळ होण्यासाठी घाला. कढईला खवा चिटकू नये याची काळजी घ्या. चमच्याने हे मिश्रण हलवत राहा. खवा सुटा झाला की, त्यामध्ये हवी तेवढी साखर घाला. तुम्ही खवा गोड लागतो की नाही, टेस्टदेखील करू शकता. खवा, दूध, साखर याचे मिश्रण चांगले हलवून साखर विरघळली की गॅस बंद करा.

काजूचे आरोग्यदायी फायदे

आता दुसरीकडे एका पॅनमध्ये दोन टी स्पून साजूक तूप घालून सर्व सुका मेवा लाल होईपर्यंत भाजून घ्या.

बाजारात खीर बनवण्याच्या बारीक शेवया मिळतात. काही भाजलेल्या देखील मिळतात. पण, तरीही तुम्ही घरी त्या पुन्हा भाजून घेऊ शकता.

शेवया लांबीने मोठ्या असतात. त्या कुसकरून घ्या. एका भांड्यात २ टी स्पून तूप टाकून शेवया चांगल्या भाजा. तांबूस रंग आला की गॅस बंद करा .

आता एका स्वच्छ भांड्यात दूध काढा. जर अडीच लिटर दूध असेल तर एक लिटर पाणी घाला आणि उकळायला ठेवा. दुधाला चांगली उकळी आल्यानंतर भांडे खाली उतरवून थंड होऊ द्या. दूध पूर्ण थंड होऊ द्या. दूध थंड झाले की, खव्याचे मिश्रण हळूहळू घालत दूध मोठ्या चमच्याने हलवत राहा. खव्याच्या गाठी होऊ नयेत याकडे लक्ष द्या.

दूध आणि खवा एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये सर्व सुकामेवा घाला. थोडी वेलची पावडर घाला. जायफळ खिसणीवर खिसून अगदी थोडे गालावे. आता दुधाचे भांडे पुन्हा गॅसवर ठेवा. मध्यम आचेवर ठेवून दूध उकळू द्या. दुधाला उकळ आल्यानंतर त्यामध्ये शेवया टाका. खीर अधिक गोड हवी असेल तर वरून साखर घालू शकता. सुगंधासाठी तुमच्याकडे वेनिला इसेन्स किंवा केवडा इसेन्स असेल तर अर्धा टी स्पून घालू शकता. दुधाला १० ते १५ मिनिटे उकळ येऊ द्या. उकळ येताना केशर घाला. यामुळे छान पिवळसर केशरी रंग येतो. शेवया आणि सुका मेवा चांगला शिजू द्या. खीर गोडीला टेस्ट करून पाहा. खीरीचे भांडे खाली उतरवून थंड होऊ द्या.

 

Back to top button