

कराची : वृत्तसंस्था : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या गुजरानवाला या ठिकाणच्या रॅलीमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात इम्रान खान यांच्या पायाला जखम झाल्याची माहिती आहे. यानंतर इम्रान खान यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हवलण्यात आलं आहे. इम्रान खान यांच्यासोबत तीन ते चार जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
इम्रान खान यांच्यावर चार ते पाच हल्लेखोरांनी गोळीबार केल्याचं समोर आलं असून त्यापैकी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. इम्रान खान यांच्यावर झालेल्या या गोळीबारानंतर केवळ पाकिस्तानच नव्हे तर जग हादरलं आहे. पाकिस्तान सध्या राजकीय आणि आर्थिक अस्थिरतेतून जात असून या देशात सध्या अनागोंदीच्या वातावरणातून जात आहे.